मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

अरे बापरे! हा असा कसला Covid Side effect; विचित्र समस्येमुळे हैराण झाली मॉडेल

अरे बापरे! हा असा कसला Covid Side effect; विचित्र समस्येमुळे हैराण झाली मॉडेल

कोरोना होताच मॉडेलला ही समस्या सुरू झाली, त्यापासून तिची अद्यापही आराम मिळालेला नाही.

कोरोना होताच मॉडेलला ही समस्या सुरू झाली, त्यापासून तिची अद्यापही आराम मिळालेला नाही.

कोरोना होताच मॉडेलला ही समस्या सुरू झाली, त्यापासून तिची अद्यापही आराम मिळालेला नाही.

  • Published by:  Priya Lad

कॅनबेरा, 06 जानेवारी : कोरोनाची (Coronavirus) लागण झाल्यावर त्याची लक्षणं तर दिसतात. पण त्यावर उपचार होऊन तो बरा झाल्यानंतरही काही दुष्परिणाम जाणवतात (Post covid symptoms). एका मॉडेलला तर कोरोना झाल्यानंतर (Corona symptoms) विचित्र समस्येचा सामना करावा लागतो आहे. तिने आपल्या सोशल मीडियावर आपली अवस्था सांगितली आहे.

29 वर्षांची मॉडेल ऑलिविया रोजर्स. जी याआधी मिस युनिव्हर्स स्पर्धेतही सहभागी झाली होती. तिच्या पार्टनरला कोरोना झाला. त्यानंतर तिलाही कोरोनाची लागण झाली. कोरोना झाल्यावर तिला एक समस्या जाणवली आणि तिची ही समस्या कोरोनावरील उपचारानंतरही जैसे थे आहे. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर ऑलिवियाला ढेकर येऊ लागल्या. त्या अजूनही थांबल्या नाहीत.

हे वाचा - पालकांनी राहा Alert..! लस घेतल्यानंतर मुलांमध्ये दिसू शकतात 'हे' Side Effects

द सनच्या रिपोर्टनुसार, ऑलिवियाने सांगितलं की कोरोनाच्या उपचारादरम्यान तिला सतत ढेकर येत होती. याबाबत मी गुगलवर सर्च केलं. तेव्हा कोरोनामुळे असं होत असल्याची माहिती मला मिळाली. आता मी ढेकर थांबवूच शकत नाही.

मॉडेलचा हा अनुभव जेव्हा इन्स्टाग्राम युझर्सना समजला तेव्हा तिच्या 16 टक्के फॉलोअर्सनेही आपल्यालाही कोरोनादरम्यान अशीच समस्या येत असल्याचं सांगितलं.

ओमिक्रॉनमुळे गेली डोळ्यांची दृष्टी

मायक्रॉनची (New variant Omicron) अनेक लक्षणं समोर येत आहेत. नुकतच ओमायक्रॉनबाबत एक नवीन केस समोर आली आहे. (The child lost his eye sight in 7 days due to Omicron) ज्यात ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या 9 वर्षांच्या मुलाची दृष्टी गेली.

हे वाचा - मोठी बातमी: Omicron मुळे उदयास येणार नवा व्हेरिएंट?

नाताळदरम्यान 9 वर्षांचा जॅक कोविड पॉझिटिव्ह झाला होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याला कोविडची लागण झाल्याचं समोर आलं. या आजारात हळूहळू त्याची दृष्टी कमी होत गेली. कोविड टेस्ट केल्याच्या एका आठवड्याच्या आत त्याच्या डाव्या डोळ्याची दृष्टी गेली. याशिवाय ऑर्बिटल सेल्यूलाइटिसमुळे त्याचा डोळा पूर्णपणे बंद झाला आहे. हे एक स्किन संक्रमण असून काही वैज्ञानिकांनी याला व्हायरसशी जोडलं आहे.

First published:

Tags: Corona, Coronavirus, Coronavirus symptoms, Symptoms of coronavirus