Home /News /national /

लस घेतल्यानंतर मुलांमध्ये दिसू शकतात 'हे' Side Effects, पालकांनी राहावे सतर्क

लस घेतल्यानंतर मुलांमध्ये दिसू शकतात 'हे' Side Effects, पालकांनी राहावे सतर्क

देशभरातल्या राज्य सरकारनी लहान मुलांच्या लसीकरणासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्याच दिवशी 30 लाख मुलांना कोरोनाची लस देण्यात आली.

    नवी दिल्ली, 06 जानेवारी: 3 जानेवारी 2022 पासून देशभरात 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोरोनाची (Corona vaccine) लस दिली जात आहे. देशभरातल्या राज्य सरकारनी लहान मुलांच्या लसीकरणासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्याच दिवशी 30 लाख मुलांना कोरोनाची लस देण्यात आली, तर एक कोटीहून अधिक मुलांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. रॅडिक्स हॉस्पिटलचे डॉ. रवी मलिक म्हणाले की, “पालकांनी हे लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे की लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर तुमच्या मुलांना सूज येणार नाही. पहिल्या डोसच्या 4 आठवड्यांनंतर, दुसरा डोस घेतला जाईल आणि त्यानंतर 4 आठवड्यांनंतर रोगप्रतिकारक शक्ती विकसित होईल आणि त्यानंतरही संपूर्ण सुरक्षा ठेवणं खूप महत्वाचं आहे. आजतकनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. लहान मुलांमध्ये लसीकरणाबाबत प्रचंड उत्साह असून तेही लस घेत आहेत. दरम्यान, पालकांनीही आपल्या मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण जसे लसीकरणाचे काही संभाव्य दुष्परिणाम 18 आणि 60 पेक्षा जास्त वयोगटातील लोकांमध्ये दिसून आले होते, तसेच ते लहान मुलांमध्ये देखील दिसू शकतात, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. हे सौम्य दुष्परिणाम दर्शवतात की लस काम करू लागली आहे. लालसरपणा आणि वेदना (Redness and soreness)  ज्या हातावर लस दिली आहे. त्या ठिकाणी लहान मुलांना वेदना जाणवू शकतात. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, लसीकरणानंतर लालसरपणा आणि वेदना कमी करण्यासाठी लसीकरण भागावर थंड, मऊ कापड ठेवण्याचा सल्ला दिला जातो. लसीकरणानंतर बेशुद्ध होणं (Fainting after getting a shot) कोणत्याही लसीनंतर लहान मुलं बेशुद्ध होणं किंवा चक्कर येणं हे खूप सामान्य आहे. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांनुसार, लसीकरणानंतर सुमारे 15 मिनिटं बसणे किंवा झोपणे हे चक्कर टाळण्यास मदत करू शकते. या कारणास्तव लसीकरणानंतर, लसीकरण केंद्राचे डॉक्टर काही काळ लसीकरण केलेल्या लहान मुलांना त्यांच्या देखरेखीखाली ठेवतात. सौम्य ताप (Mild fever) आरोग्य तज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, लसीकरणानंतर लहान मुलांना हलका तापही येतो. 18 आणि 60 वर्षांवरील लोकांना हलका ताप आल्यास गोळी घेण्याचा सल्ला देण्यात आला होता, परंतु जर तुमच्या मुलालाही ताप आला असेल, तर त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही त्यांनी लिहून दिलेले औषध घेऊ शकता. थकवा आणि शरीर दुखणे (Fatigue and body pain) लस दिल्यानंतर, मुलांना थकवा आणि अंगदुखीचा त्रास होऊ शकतो. जर तुम्हाला तुमच्या मुलांमध्येही अशी लक्षणे दिसली तर घाबरण्याऐवजी त्यांना आराम करु द्या आणि CDC नुसार भरपूर लिक्विड पदार्थ द्या. लिक्विड पदार्थांमध्ये पॅक केलेल्या लिक्विडचे सेवन करू नका. चक्कर येणे (Dizziness) ही लस घेतल्याचा दुष्परिणाम नाही. लसीकरणानंतर काही मुलांना चक्कर येऊ शकते, परंतु घाबरण्याची गरज नाही. जेव्हा मुले रिकाम्या पोटी लस घेतात तेव्हा असे होते. त्यामुळे मुलांनी लस घेण्यासाठी रिकाम्या पोटी जाऊ नये याकडे पालकांनी लक्ष द्यावे. या व्यतिरिक्त इतर कोणतीही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus

    पुढील बातम्या