नवी दिल्ली, 30 एप्रिल: केंद्राने राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना गुरुवारी असे आदेश दिले आहेत की, ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची प्रकरणं (Coronavirus in India) जास्त आहेत, त्याठिकाणी या विषाणूचा प्रसार (Containment Zone) रोखण्यासाठी स्थानिक कंटेनमेंट झोन बनवण्यासारखे उपाय राबवण्यात यावेत. गृहमंत्रालयाने (Home Ministry) कोरोनाचं वाढतं संक्रमण लक्षात घेता मे महिन्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे, यामध्ये कोणत्याही ठिकाणी लॉकडाऊन (Lockdown) लावण्याबाबत नमूद करण्यात आलेले नाही. या मार्गदर्शक सूचनांमध्ये अशी माहिती देण्यात आली आहे की, अशा जिल्ह्यांमध्ये कंटेनमेंट झोन बनवण्याबाबत विचार करण्यात यावा ज्याठिकाणी कोव्हिड संक्रमण दर किंवा पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांपेक्षा जास्त आहे तसंच ज्याठिकाणी एका आठवड्यामध्ये 60 टक्क्यांपेक्षा जास्त बेड्स भरले जात आहेत. गुरुवारी गृह मंत्रालयाने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्याअंतर्गत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कंटेनमेंट झोनबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. (हे वाचा- कोरोनाचा कहर सुरूच; दैनंदिन रुग्णसंख्येची 4 लाखाकडे वाटचाल ) गृह मंत्रालयाच्या आदेशासह, सामुदायिक कंटेनमेंट झोन आणि मोठ्या कंटेनमेंट झोनसारखी क्षेत्रं तयार करण्याच्या रुपरेखा लागू करण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा सल्ल्याही यामध्ये जोडण्यात आला आहे. निवेदनात असे म्हटले आहे की कोव्हिड-19 च्या व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे देशभर कठोरपणे लागू केली जातील. गृहमंत्रालयाचा आदेश 31 मे पर्यंत लागू होणार आहे. (हे वाचा- फक्त 14 दिवस आणि 3 टप्पे; कोरोनाविरोधी लढा जिंकण्याचा बेस्ट फॉर्म्युला ) कोरोनाची दुसरी लाट अतिशय बिकट परिस्थिती देशात निर्माण करत आहे. गृह मंत्रालयाने अशी प्रतिक्रिया दिली आहे की, सध्याच्या लाटेपासून वाचण्यासाठी विषाणूचा प्रसार रोखण्याकडे लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. ज्या भागात संक्रमण होण्याच्या घटनांची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता रात्रीच्या वेळी लोकांच्या येण्याजाण्यावर पूर्ण बंदी असेल. सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक इत्यादी कार्यक्रमांसाठी गर्दी करण्यास सक्त मनाई असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.