Home /News /coronavirus-latest-news /

कोरोना संकटाच्या काळात अमेरिकेची मदत, मेडिकल साहित्याची पहिली खेप भारतात दाखल

कोरोना संकटाच्या काळात अमेरिकेची मदत, मेडिकल साहित्याची पहिली खेप भारतात दाखल

अमेरिकेतून 280 ऑक्सिजन कन्सन्ट्रेटरसह मेडिकल साहित्याची पहिली खेप भारतात (Medical Supply Arrived from America) पोहोचली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी अमेरिकेचे आभार मानले आहेत.

    नवी दिल्ली 30 एप्रिल : देशात कोरोना (Coronavirus in India) स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. देशात दररोज कोरोनाचे तीन लाखाहून अधिक नवे रुग्ण आढळत आहेत. सध्या परिस्थिती अशी आहे, की रुग्णालयांमध्ये बेडही शिल्लक नाहीत. याशिवाय कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Corona Second Wave) जीव वाचवण्यासाठी लोकांना ऑक्सिजनही (Oxygen Shortage) मिळत नसल्याची स्थिती आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येदरम्यान देशात ऑक्सिजनसह अनेक आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. भारतातील ही परिस्थिती पाहाता आता इतर देशांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. याच पार्श्वभूमीवर आज अमेरिकेतून 280 ऑक्सिजन कन्सन्ट्रेटरसह मेडिकल साहित्याची पहिली खेप भारतात (Medical Supply Arrived from America) पोहोचली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी अमेरिकेचे आभार मानले आणि सांगितलं की ही गोष्ट महामारीविरोधात लढा देण्यासाठीची आपली सामायिक बांधिलकी दर्शवते. 120 रुग्णांना दिलेलं Remdesivir निघालं खराब,साइड इफेक्ट्स दिसल्याने वापर थांबवला एएफपीनं दिलेल्या वृत्तानुसार, 400 हून अधिक ऑक्सिजन सिलेंडरसह एक दशलक्ष रॅपिड कोरोना व्हायरस टेस्ट कीट आणि इतर मेडिकल साहित्य घेऊन अमेरिकेच्या सैन्याचं विमान आज सकाळी नवी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं. ऑक्सिजन, लशींचे दर यासंह अनेक मुद्द्यांवर SC मध्ये सरकार मांडणार बाजू एक ट्विट शेअर करत अमेरिकन दूतावासाने वैद्यकीय उपकरणाचे फोटो शेअर केले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, या संकटाच्या काळात अमेरिकेतून कोरोनासोबत लढा देण्यासाठी गरजेचं असणाऱ्या साहित्याची पहिली खेप भारतात पाठवण्यात आली आहे. 70 वर्षांहून अधिक काळापासून आजपर्यंत अमेरिका भारतासोबत उभा आहे. आपण एकत्र मिळून या महामारीचा सामना करत आहोत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona updates, Coronavirus, India america

    पुढील बातम्या