मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /आता 30 मिनिटांत होणार COVID-19चं निदान, मुंबई महापालिका राबवणार खास मिशन

आता 30 मिनिटांत होणार COVID-19चं निदान, मुंबई महापालिका राबवणार खास मिशन

रुग्णालयात दाखल केलेल्या अर्ध्याहून अधिक रूग्णांनी डोकेदुखी, चक्कर येणं, अस्वस्थता, लक्ष केंद्रित करण्यात अडचण, गंध आणि चव गमावणं, झडके, अशक्तपणा आणि स्नायू दुखणे अशी न्यूरोलॉजिकल लक्षणं दर्शविली आहेत.

रुग्णालयात दाखल केलेल्या अर्ध्याहून अधिक रूग्णांनी डोकेदुखी, चक्कर येणं, अस्वस्थता, लक्ष केंद्रित करण्यात अडचण, गंध आणि चव गमावणं, झडके, अशक्तपणा आणि स्नायू दुखणे अशी न्यूरोलॉजिकल लक्षणं दर्शविली आहेत.

या चाचणीचा परिणाम हा 15 ते 30 मिनिटांच्या आत प्राप्त होत असल्याने बाधित रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होते.

    मुंबई 23 जून: मुंबईत (Mumbai) वाढत चाललेल्या कोरोना व्हायरसला (Coronavirus) रोखण्यासाठी महापालिकेने आणखी एक मिशन हाती घेतलं आहे. याचाच एक भाग म्हणून महानगरपालिकेने (BMC) आता “मिशन युनिव्हर्सल टेस्टिंग” हे मिशन हाती घेतलं आहे.  यातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे अवघ्या अर्ध्या तासात कोरोना चाचणीचा अहवाल मिळणार आहे. त्यासाठी अँटीजेन टेस्टिंगच्या (Antigen Tests) एक लाख कीट खरेदी करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. तसेच शासनाने नुकत्याच दिलेल्या मान्यतेनुसार रॅपिड टेस्टींग कीट खरेदी करुन आपल्या कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यास कॉर्पोरेट हाऊसेस, खासगी कंपन्या यांनाही सुचवण्यात आले आहे.

    भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR)ने मान्यता दिलेल्या एसडी बायोसेन्सर या एकमेव कंपनीच्या कीटद्वारे अँन्टीजेन टेस्टींग करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सध्याच्या आरटीपीसीआर या एकमेव निदान चाचणीच्या तुलनेत ही चाचणी अतिशय वेगवान बाधा निश्चित करणारी आहे.

    त्याचा उपयोग करुन कोरोना हॉटस्पॉट किंवा प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये तसेच अति जोखमीच्या आणि कोरोनासह इतर आजार असलेल्या रुग्णांची चाचणी करुन तातडीने बाधा निश्चिती करण्यात येते. या चाचणीचा परिणाम हा 15 ते 30 मिनिटांच्या आत प्राप्त होत असल्याने बाधित रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होते.

    केंद्राच्या दणक्यानंतर पतंजलीने दिले हे पुरावे; कोरोना 100% बरा केल्याचा दावा

    ही बाब लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने शासन मान्य ॲन्टीजेन कीटच्या 1 लाख कीट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच या कीट उपलब्ध होणार आहेत. हे कीट मुंबईतील महानगरपालिकेची सर्व रुग्णालये, शासन रुग्णालये तसेच कोरोना उपचार केंद्र आदी ठिकाणी उपयोगात येतील. यातून लक्षणे दिसत असलेल्या संशयितांची तातडीने चाचणी करुन संसर्गाला रोखण्याची उपाययोजना अतिशय वेगवान होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

    दररोज निदान होणाऱ्या रुग्णांच्या एक दिवसाची संख्या थोडी कमी झाल्याचं आज दिसलं. गेले सात दिवस दररोज किमान 3700 ते 4000 दरम्यान रुग्णवाढ होत होती.  ती आज  3214 वर आली. महाराष्ट्राचा कोविड मृत्यूदर देशाच्या तुलनेत अजूनही जास्तच आहे. गेल्या 48 तासांत 75 तर आधीच्या काही दिवसांतले मिळून 173 असे 248 कोरोना मृत्यू आज राज्यात नोंदले गेले. 1925 रुग्णांना बरं होऊन डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेटसुद्धा थोडासा सुधारला आहे.

    गेल्या 4-5 दिवसांत चीनकडून 40300 सायबर हल्ले; सायबर विभागाकडून नियमावली जारी

    देशाचा सरासरी कोविड मृत्यूदर 3.36 आहे. तोही गेल्याच आठवड्यात 2.8 वरून वाढून एवढा झाला आहे. महाराष्ट्राचा मृत्यूदर 4.69 झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 1,39,010 रुग्ण कोविड पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 62,833 आहे. आतापर्यंत 69,631 रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे.

    संपादन - अजय कौटिकवार

     

     

     

    First published:
    top videos

      Tags: Coronavirus, Coronavirus update