मराठी बातम्या /बातम्या /देश /केंद्राच्या दणक्यानंतर पतंजलीने दिले हे पुरावे; कोरोना 100 टक्के बरा केल्याचा दावा

केंद्राच्या दणक्यानंतर पतंजलीने दिले हे पुरावे; कोरोना 100 टक्के बरा केल्याचा दावा

कोरोनिल औषधाबाबत पतंजलीने केलेल्या दाव्यानंतर आयुष मंत्रालयाने याबाबत सविस्तर माहिती मागितली होती.

कोरोनिल औषधाबाबत पतंजलीने केलेल्या दाव्यानंतर आयुष मंत्रालयाने याबाबत सविस्तर माहिती मागितली होती.

कोरोनिल औषधाबाबत पतंजलीने केलेल्या दाव्यानंतर आयुष मंत्रालयाने याबाबत सविस्तर माहिती मागितली होती.

  नवी दिल्ली, 23 जून : जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाव्हायरसविरोधातील औषध (coronavirus medicine) आणि लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात पतंजलीने (patanjali) कोरोनाव्हायरसविरोधात औषध शोधून काढलं आहे. कोरोनिल (Coronil) या औषधामुळे कोरोना 100% बरा होतो असा दावा पतंजलीने केला. यानंतर केंद्र सरकारने पतंजलीला दणका दिला होता. आपल्याला या औषधाबाबत काहीही माहिती नाही. आधी सविस्तर माहिती द्यावी, तोपर्यंत जाहिरात थांबवा, असे आदेश दिले होते. केंद्राच्या दणक्यानंतर पतंजलीने या औषधाबाबत केंद्र सरकारला पुरावे दिलेत.

  कोरोनिल औषधाची कोरोना रुग्णांवर चाचणी करण्यात आली. कोरोनिल औषधाचा रिझल्ट हा शंभर टक्के आहे.  69 टक्के कोरोना रुग्ण 3 दिवसांमध्ये बरे झाले तर 100 टक्के कोरोना रुग्ण सात दिवसांमध्ये बरे झालेत, असा दावा रामदेव बाबा यांनी केला.  संपूर्ण नियमांचे पालन करून हे औषध तयार करण्यात आले आहे, अशी माहिती रामदेव बाबांनी दिली. केंद्र सरकारने याबाबत सविस्तर अहवाल मागितल्यानंतर पतंजलीने केंद्राकडे पुरावे सादर केलेत. आचार्य बालकृष्ण यांनी याबाबत फेसबुक पोस्ट केली आहे.

  आचार्य बालकृष्ण म्हणाले, "हे सरकार आयुर्वेदाला प्रोत्साहन देणारं सरकार आहे. जो कम्युनिकेशन गॅप होता तो दूर झाला आहे. औषधाच्या ट्रायलचे स्टँडर्ड पॅरामिटर्स असतात, ते 100 टक्के पूर्ण केलेत. याची माहिती आम्ही आयुष मंत्रालयाला दिली आहे"

  हे वाचा - 'कोरोनिल'ची जाहिरात थांबवा, आधी सविस्तर माहिती द्या; केंद्राचा पतंजलीला दणका

  आयुष मंत्रालयाने या औषधाची माहिती, त्याचं क्लिनिकल चाचणी कुठे करण्यात आली, त्याला मान्यता कुणी दिली आणि त्याचा परिणाम काय आला, याबाबत सविस्तर माहिती अहवाल सुपूर्द करण्याचे आदेश आयुष मंत्रालयाने दिले होते. तसंच उत्तराखंड राज्याच्या संबंधित परवाना प्राधिकरणालाही या उत्पादनाला परवानगी दिल्याच्या तपशील सादर करण्यास सांगितलं होतं.

  हे वाचा - 'कोरोनिल'ची किंमत किती आणि मिळणार कधी? बाबा रामदेव बाबांनी केले स्पष्ट

  कोरोनिलमध्ये गिलोय, अश्‍वगंधा, तुलसी, श्‍वसारी रस आणि अणू तेलाचे  मिश्रण आहे. या औषधामध्ये असलेला अश्वगंधा या व्हायरसच्या रिसेप्टर बाइंडिंग डोमेनला शरीरातील अँजिओटेन्सीन कनवर्टिंग एंजाइमला शरीरात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करतं, असं पतंजलीने सांगितलं. पतंजली रिसर्च सेंटर आणि नॅशनल मेडिकल इन्स्टिट्युट सायन्स निम्स यांच्या संयुक्त विद्यमानाने या औषधाचं ट्रायल घेण्यात आलं.

  संपादन - प्रिया लाड

  First published:
  top videos

   Tags: Aayush, Baba ramdav, Coronavirus, Patanjali