मुंबई 06 एप्रिल : कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. राज्यातही रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं समोर येत असून बुधवारी 569 नवे रुग्ण आढळून आले. यानंतर राज्यातील एकूण कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 3 हजार 874 वर पोहोचली आहे. याशिवाय दोन बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून यातील एक रुग्ण मुंबईतील आहे. COVID-19 : राज्यासाठी कोरोनाचा हायअलर्ट! 24 तासात रुग्णांची धक्कादायक आकडेवारी, चौघांचा मृत्यू कोरोनाची लस न घेतलेल्यांसाठी ही चिंता वाढवणारी बातमी आहे. कारण मुंबईतील चेंबूर परिसरातील एका 69 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. या व्यक्तीने लसीचा एकही डोस घेतला नसल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. त्यामुळे लस न घेतलेल्या व्यक्तींसाठी ही चिंता वाढवणारी घटना आहे. यासोबतच या व्यक्तीला मूत्रपिंड, हृदयविकाराचा त्रास आणि उच्च रक्तदाबाचा त्रासही होता. आता मुंबईतील कोरोना मृत्यूची संख्या 19 हजार 748 वर पोहोचली आहे. तर, मुंबईत 221 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यानंतर मुंबईतील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 11 लाख 57 हजार 968 वर पोहोचली आहे. सध्या मुंबईत 1 हजार 244 रुग्ण उपचाराधीन आहेत. कोरोनाचा धोका वाढला, ‘या’ जिल्ह्यात मास्कसक्ती; कशी आहे राज्याची आरोग्य यंत्रणांची स्थिती? राज्यातील आतापर्यंतच्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या 81 लाख 46 हजार 870 वर पोहोचली आहे. तर बुधवारी झालेल्या दोन रुग्णांच्या मृत्यूनंतर मृतांची संख्या 1 लाख 48 हजार 451 वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत 79 लाख 94 हजार 545 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 98.13 टक्के आहे. सध्या राज्यात 3 हजार 324 सक्रिय रुग्ण आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.