मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /कोरोना लस घेतलेल्यांनाच Omicron ने गाठलं; ओमिक्रॉनबाधितांपैकी 91 टक्के Vaccinated

कोरोना लस घेतलेल्यांनाच Omicron ने गाठलं; ओमिक्रॉनबाधितांपैकी 91 टक्के Vaccinated

India omicron cases : देशातील ओमिक्रॉन रुग्णांच्या विश्लेषणातून केंद्र सरकारला मिळाली धक्कादायक माहिती.

India omicron cases : देशातील ओमिक्रॉन रुग्णांच्या विश्लेषणातून केंद्र सरकारला मिळाली धक्कादायक माहिती.

India omicron cases : देशातील ओमिक्रॉन रुग्णांच्या विश्लेषणातून केंद्र सरकारला मिळाली धक्कादायक माहिती.

नवी दिल्ली, 24 डिसेंबर : ओमिक्रॉनवर (Omicron) कोणती लस प्रभावी ठरेल याबाबत संशोधन सुरू आहे (Omicron cases in India). काही लशींचा यावर प्रभाव होत नसल्याचं दिसून आलं आहे. अशात आता भारतातील ओमिक्रॉनबाधितांचा धक्कादायक रिपोर्ट आला आहे. भारतात ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांपैकी 91 टक्के रुग्ण हे कोरोना लसीकरण झालेले आहेत (Corona vaccinated people Omicron). केंद्र सरकारनेच ही धक्कादायक माहिती दिली आहे.

देशातील 17 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 358 ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. भारतातील बहुतेक ओमिक्रॉन प्रकरणांमध्ये लक्षणं नाही दिसत आहेत. ज्यांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, त्यांच्यामध्ये याचं निदान झालं आहे.

केंद्र सरकारने भारतातील 183 ओमिक्रॉन रुग्णांचं विश्लेषण केलं. त्यानुसार 70% रुग्णांमध्ये लक्षणं नाहीत तर आहेत. 91 टक्के प्रकरणं पूर्ण लसीकरण झालेले आहेत. शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेच केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी ही माहिती दिली.

सरकारी आकडेवारीनुसार

70 टक्के रुग्णांमध्ये लक्षणं नाहीत, 30 टक्के रुग्णांमध्ये लक्षणं आहेत.

73 टक्के रुग्ण परदेशाहून आलेले आहेत, 27 टक्के रुग्णांनाचा कोणताही परदेश प्रवास नाही.

91 टक्के रुग्ण कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले, 7 टक्के रुग्ण लस न घेतेले, 2 टक्के रुग्ण लशीचा एक डोस घेतलेले.

हे वाचा - Delta, Omicron नंतर Delmicron; किती धोकादायक आहे कोरोनाचा Double Variant?

ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लशीच्या क्षमतेवर हा अभ्यास ब्रिटनमध्ये करण्यात आला. त्यानुसार जगातील बहुतेक लशी कोरोनाच्या झपाट्यानं वाढणाऱ्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग रोखण्यास असमर्थ ठरण्याची शक्यता आहे. एका प्राथमिक संशोधनाच्या आधारे हे सांगण्यात आलं आहे. भारतात लसीकरण झालेल्या लोकांपैकी 90% लोकांना देखील Omicron च्या संसर्गाचा धोका आहे.

भारताच्या संदर्भात अभ्यासाविषयी बोलताना असं म्हटलं आहे की, ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका लसीनं सहा महिन्यांच्या लसीकरणानंतर ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्याची कोणतीही क्षमता दर्शविली नाही. भारतात, लसीकरण केलेल्या 90 टक्के लोकांना AstraZeneca लस Covishield या ब्रँड नावाखाली मिळाली आहे. या लसीचे 65 दशलक्षाहून अधिक डोस 44 आफ्रिकन देशांमध्ये वितरित केले गेले आहेत.

हे वाचा - Delta, Omicron नंतर Delmicron; किती धोकादायक आहे कोरोनाचा Double Variant?

प्राथमिक संशोधनानुसार, जॉन्सन अँड जॉन्सन, रशिया आणि चीनमध्ये बनवलेल्या लशीदेखील ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी कुचकामी किंवा खूपच कमी सक्षम असल्याचं आढळलं आहे.  केवळ फायझर आणि मॉडर्ना लस कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटचा संसर्ग रोखण्यास सक्षम आहेत. मात्र, यासाठी या लसींचा बूस्टर डोस द्यावा लागेल. या दोन्ही लसी जगातील बहुतांश देशांमध्ये उपलब्ध नाहीत.

First published:

Tags: Coronavirus