मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Covid Symptoms In Children : लहान मुलांमध्ये दीर्घकाळ राहतोय कोरोना विषाणू? संशोधनातून चिंताजनक माहिती समोर

Covid Symptoms In Children : लहान मुलांमध्ये दीर्घकाळ राहतोय कोरोना विषाणू? संशोधनातून चिंताजनक माहिती समोर

चिमुकले कोरोनाच्या विळख्यात.

चिमुकले कोरोनाच्या विळख्यात.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांना फारसा धोका नव्हता. परंतु आता या तिसऱ्या लाटेच्या काळात लहान मुलांच्या आरोग्यावर (Long Covid Symptoms In Children) आणि त्यांच्यावर संक्रमणाचा अधिक धोका असल्याची भाकीतं अनेक वैद्यकीय सल्लागारांनी केली होती. आता ती भिती खरी ठरण्याची चिन्हं आहेत. कारण तिसरी लाट येण्याआधीच आता रुग्णालयांमध्ये कोरोनाग्रस्त लहान मुलांचे प्रमाण वाढत आहे.

पुढे वाचा ...

दिल्ली, 14 सप्टेंबर : कोरोनामुळे (Corona) माणसांचं जनजीवन मागच्या वर्षभरापासून प्रभावित झालेलं आहे. या महामारीमुळे लाखो भारतीयांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेलाही (Economy) कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता कोरोनाला लोक घाबरलेले असून प्रत्येक गोष्टीत आता ते त्यांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांना फारसा धोका नव्हता. परंतु आता या तिसऱ्या लाटेच्या काळात लहान मुलांना (Long Covid Symptoms In Children) अधिक धोका असल्याची भाकीतं अनेक वैद्यकीय सल्लागारांनी केली होती. आता ती भीती खरी ठरण्याची चिन्हं आहेत. कारण तिसरी लाट येण्याआधीच आता रुग्णालयांमध्ये कोरोनाग्रस्त लहान मुलांचे प्रमाण वाढत आहे. त्यातच आता इंग्लंडमध्ये झालेल्या एका संशोधनात लहान मुलांवर कोरोनाचा प्रभाव हा दीर्घकालीन (Long COVID Symptoms) राहू शकतो, असं समोर आलं आहे. त्यामुळे साहजिकच आता पालकांना आपल्या मुलांची चिंता वाटू लागली आहे.

Explainer - दोन डोसनंतर तिसरा डोस; कोरोनाचा Booster dose फायद्याचा ठरेल?

इंग्लंडमध्ये झालेल्या या संशोधनानुसार कोरोनामुळे प्रत्येक 7 पैकी 1 लहान मुल हे दीर्घकालीन कोरोना आजाराच्या लक्षणांनी ग्रस्त आहे. त्यात कोरोना झाल्यानंतर त्यातून बरे होणाऱ्या मुलांचे प्रमाण फार कमी आहे. त्यामुळे आता कोरोनाने लहान मुलांना धोका निर्माण झाला आहे. यूनिवर्सिटी कॉलेज ऑफ लंडन (University College of London) च्या संशोधकांनी एका मोठ्या संशोधनात असा दावा केला आहे की ज्या लहान मुलांना कोरोना झाला होता, ते त्यातून बरे झाले तरीही त्यांच्यात अजूनही कोरोनाची लक्षणं आहेत. या संशोधनासाठी इंग्लंडमधील 11 ते 17 वर्षीय मुलांना सहभागी करण्यात आले होते. ही सर्व मुले ही जानेवारीत कोरोनामुळे Positive झाली होती. त्याचबरोबर या संशोधनात अशाही मुलांना सहभागी करून घेण्यात आलं ज्यांच्यात कोरोनाची लक्षणं नव्हती.

First published:
top videos

    Tags: Covid-19 positive, England, School children