मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Corona मृत्यू कमी करण्यासाठी लॉकडाऊन विशेष प्रभावी नाही, अभ्यासातून नवा दावा

Corona मृत्यू कमी करण्यासाठी लॉकडाऊन विशेष प्रभावी नाही, अभ्यासातून नवा दावा

अमेरिका (US) आणि युरोपमध्ये (Europe) कोविड-19 मुळे होणारे मृत्यू (death) कमी करण्यासाठी लॉकडाऊनचा (lockdown) प्रभाव कमी किंवा अगदी नसल्यासारखा होता, असं संशोधकांना एका अभ्यासात आढळलं आहे.

अमेरिका (US) आणि युरोपमध्ये (Europe) कोविड-19 मुळे होणारे मृत्यू (death) कमी करण्यासाठी लॉकडाऊनचा (lockdown) प्रभाव कमी किंवा अगदी नसल्यासारखा होता, असं संशोधकांना एका अभ्यासात आढळलं आहे.

अमेरिका (US) आणि युरोपमध्ये (Europe) कोविड-19 मुळे होणारे मृत्यू (death) कमी करण्यासाठी लॉकडाऊनचा (lockdown) प्रभाव कमी किंवा अगदी नसल्यासारखा होता, असं संशोधकांना एका अभ्यासात आढळलं आहे.

नवी दिल्ली, 03 फेब्रुवारी: कोरोना व्हायरसमुळे (corona virus) होणारे मृत्यू रोखण्यासाठी लॉकडाऊन फारसे उपयुक्त ठरत नाही. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात याचे संकेत मिळाले आहेत. अमेरिका (US) आणि युरोपमध्ये (Europe) कोविड-19 मुळे होणारे मृत्यू (death) कमी करण्यासाठी लॉकडाऊनचा (lockdown) प्रभाव कमी किंवा अगदी नसल्यासारखा होता, असं संशोधकांना एका अभ्यासात आढळलं आहे. लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेवर (economy) वाईट परिणाम झाला आणि सामाजिक स्तरावरही विपरित परिणामच झाल्याचं अभ्यासात लक्षात आलं आहे.

जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात अनेक वैज्ञानिक अभ्यासांची समीक्षा केली गेली. त्यातून संशोधकांना असं आढळून आलं आहे की 2020 मध्ये, महामारीच्या सुरुवातीच्या टप्प्यात लॉकडाऊन लावल्यानंतर कोविड-19 मुळे होणाऱ्या मृत्युंचं प्रमाण सुमारे 0.2 टक्क्यांनी कमी झालं आहे. 'लॉकडाऊन, शाळा बंद, बॉर्डर बंद आणि लोकांच्या भेटण्यावर निर्बंध याचा कोविड-19च्या मृत्यू दरावर लक्षणीय परिणाम झाल्याचे कोणतेही पुरावे आम्हाला आढळले नाहीत,' असं संशोधकांनी लिहिलंय.

Galwan Valley: गलवान चकमकीत नदीत वाहून गेले 38 चिनी सैनिक, ऑस्ट्रेलियन मीडियाकडून चीनची पोलखोल!

 या लॉकडाऊनमुळे आर्थिक हालचाली कमी होणं, बेरोजगारी वाढणं, शालेय उपक्रम कमी करणं, राजकीय तणाव वाढणं, घरगुती हिंसाचार वाढणं आणि उदारमतवादी लोकशाहीचा प्रभाव कमी करणं, अशा गोष्टींमध्ये भर पडली आहे, असं अहवालात म्हटलं आहे. संशोधकांच्या टीममध्ये जोनस हर्बी आणि लार्स जोनंग यांचा समावेश होता.

ते म्हणाले, 'एकंदरीत, आम्हाला असं आढळलं आहे की साथीच्या काळात मृत्यू कमी करण्यासाठी लॉकडाउन प्रभावी उपाय नाही. निदान कोविड-19 महामारीच्या पहिल्या लाटेत (first wave of covid-19) तरी नाही. संशोधकांनी महामारीच्या सुरुवातीला झालेल्या मृत्यूंची तपासणी केल्यानंतर असं म्हटलं आहे. अभ्यासात लॉकडाऊन कालावधी संपेपर्यंत म्हणजेच 20 मे 2020 पर्यंत अमेरिकेत कोविडमुळे 97 हजार 81 जणांचा मृत्यू झाल्याचं त्यांना आढळलं. त्यावेळी एका मोठ्या अभ्यासात लॉकडाऊन केला नसता तर 99 हजार 50 मृत्यू झाला असता अंदाज व्यक्त करण्यात आला होता. दोन्ही आकड्यांची तुलना केल्यास फारसा फरक दिसून येत नाही.

तीन डोस असणारी स्वदेशी लस बाजारात, सुईविनाच होणार Vaccination; वाचा सविस्तर

 संशोधकांनी कोविड मृत्यूचं परीक्षण करणाऱ्या डझनभर अभ्यासांचे 'मेटा अॅनालिसिस' केले. संशोधकांना असं आढळलं की बार बंद केल्याने मृत्यूमध्ये काही प्रमाणात घट झाली. ते म्हणाले, 'अत्यावश्यक नसलेले व्यवसाय बंद केल्याने काही परिणाम झाला. त्यामुळे कोविड मृत्यूचे प्रमाण 10.6 टक्क्यांनी कमी करण्यास मदत झाली, हा बार बंद असल्याचा परिणाम असू शकतो,' असं त्यांनी म्हटलं. दरम्यान, लॉकडाऊनची वेळ आणि अनपेक्षित परिणाम मृत्युदर (death rate) प्रभावित करण्यात अपेक्षेपेक्षा मोठी भूमिका बजावू शकतात, असं जाणकारांचं म्हणणं आहे.

First published:
top videos

    Tags: Corona, Coronavirus, Covid-19, Death, India, Lockdown, Research, Wave