जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / तीन डोस असणारी स्वदेशी लस बाजारात, सुईविनाच होणार Vaccination; वाचा सविस्तर

तीन डोस असणारी स्वदेशी लस बाजारात, सुईविनाच होणार Vaccination; वाचा सविस्तर

तीन डोस असणारी स्वदेशी लस बाजारात, सुईविनाच होणार Vaccination; वाचा सविस्तर

सुईशिवाय देता येणारी आणि तीन डोस असणार भारतीय बनावटीची लस बाजारात उतरली आहे. जाणून घ्या तपशील.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी : झायडस कैडिला (Zydus Cadila) या भारतीय कंपनीची (Indian Company)  ZyCov-D ही कोरोना प्रतिबंधक लस (Anti Covid vaccine) आता बाजारात उपलब्ध झाली आहे. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारच्या आरोग्य विभागानं या लसीला मंजुरी दिली होती. त्यानंतर आता ही लस प्रत्यक्ष वापरासाठी बाजारात दाखल झाली आहे. कोरोनाविरोधातील भारताच्या लढाईत या लसीची मोठी मदत होणार असून सरकारनं या लसीची खरेदी सुरू केली आहे. अशी आहे लस आतापर्यंत जगभरातील अनेक देशांत वापरण्यात येणाऱ्या लसी या दोन डोसच्या आहेत. काही लसी या सिंगल डोसदेखील आहेत. मात्र झायडस कँडिलाची ही लस तीन डोसची असणार आहे. विशेष म्हणजे ही लस घेण्यासाठी सुईची गरज लागणार नाही. त्यामुळे भारतात उपलब्ध होणारी ही पहिली नीडललेस लस असणार आहे. DNA आधारित लस झायकोव्ह-डी ही लस DNA वर आधारित असणार आहे. आतापर्यतंच्या सर्व लसी या mRNA च्या आधारावर तयार करण्यात आल्या आहेत. मात्र ही लस DNA च्या आधारावर काम करते. इतर लसींच्या तुलनेत ही लस साठवण्याची प्रक्रिया सोपी आणि सोयीची आहे. 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमानात दीर्घकाळापर्यंत ही लस साठवून ठेवता येते. तर 25 अंश तापमानातदेखील ही लस 4 महिने साठवून ठेवणं शक्य होतं. अशी काम करते लस शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जेनेटिक मटेरियलचा वापर करून ही लस तयार करण्यात आली आहे. 28 दिवसांच्या अंतरानं या लसीचे डोस देण्यात येणार आहे. पहिला डोस 28 दिवसांनी, दुसरा डोस त्यानंतर 28 दिवसांनी आणि तिसरा डोसही 28 दिवसांनी देण्यात येईल. सुई नसणारी लस ही लस घेण्यासाठी सुई टोचून घेण्याची गरज नाही. जेट इंजेक्टरचा वापर करून ही लस टोचण्यात येणार आहे. हाय प्रेशरचा वापर करून नागरिकांच्या त्वचेत ही लस सोडली जाईल. 1960 साली या डिव्हाईसचा शोध लागला होता. WHO नं 2013 साली याच्या वापराची परवानगी दिली होती. हे वाचा- हृदयद्रावक! 7 दिवसांची चिमुकली बर्फ बनली; बापाच्या डोळ्यादेखत लेकीचा मृत्यू किती आहे किंमत कंपनीनं या लसीच्या एका डोसची किंमत 265 रुपये ठेवली आहे. त्याशिवाय प्रत्येक डोसवर 93 रुपये जीएसटी भरावा लागणार आहे. म्हणजेच एका लसीची किंमत 358 रुपये असणार आहे. सध्या मात्र सरकारकडून ही लस खरेदी करण्यात येणार असून नागरिकाना ती मोफत देण्यात येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात