Home /News /coronavirus-latest-news /

धक्कादायक! कोरोना चाचणीसाठी नमुने घेत असतानाच सिंह आणि बिबट्याचा मृत्यू

धक्कादायक! कोरोना चाचणीसाठी नमुने घेत असतानाच सिंह आणि बिबट्याचा मृत्यू

कोरोना तपासणीसाठी (Corona Test of Animals) नमुने घेत असतानाच सिंहाचा आणि बिबट्याचा मृत्यू झाला आहे.

    चेन्नई 19 जानेवारी : देशभरात कोरोनाचा (Coronavirus in India) नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा (Omicron Variant) प्रसार होताना दिसत आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच आता आणखी एक धक्क्दायक बातमी समोर आली आहे. यात एका सिंहाने आणि मादी बिबट्याने आपला जीव गमावला आहे (Lion and Leopard Died in Zoo). ही घटना तमिळनाडूच्या अरिगनार अण्णा या प्राणीसंग्रहालयात घडली. कोरोना तपासणीसाठी (Corona Test of Animals) नमुने घेत असतानाच सिंहाचा आणि बिबट्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. भारतात कधी शिगेला पोहोचणार कोरोनाची तिसरी लाट? रोज येणार 7 लाखहून अधिक नवे रुग्ण प्राणीसंग्रहालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी पीटीआयसोबत बोलताना म्हटलं, की 18 वर्षीय मादा बिबट्याचं नाव जया होतं आणि तिचा मृत्यू श्वास घेण्यास त्रास होत असल्याने झाला आहे. पुढे त्यांनी सांगितलं, की 5 वर्षीय सिंहाचं नाव विष्णू असं होतं आणि अन्ननलिकेत असलेल्या समस्येमुळे त्याचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही प्राण्यांचा मृत्यू सोमवारी तेव्हा झाला, जेव्हा पशुवैद्यकीय त्यांचे कोरोना नमुने घेत होते. कारण प्राणीसंग्रहालयातील तब्बल 70 कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसली असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं, की कर्मचारी आधीपासूनच क्वारंटाईन आहेत. आम्हाला अशी शंका होती, की प्राणीही कोरोनाबाधित होऊ शकतात. त्यामुळे, आम्ही त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. Covid Symptoms: तज्ज्ञ सांगतात, Long Covid रुग्णांमधली ही लक्षणं चिंताजनक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राण्यांनाही माणसांप्रमाणेच आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावं लागतं. मागील वर्षीही 23 वर्षीय कविता नावाच्या सिंहिणीचा मृत्यू कोरोना व्हायरसमुळे झाल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. तिला कॅन्सरही होता.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona spread, Corona updates

    पुढील बातम्या