मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Corona Vaccination : मोफत लस कुठंय? खासगी रुग्णालयांकडे साठा पडून, सरकारी केंद्रांवर मात्र खडखडाट

Corona Vaccination : मोफत लस कुठंय? खासगी रुग्णालयांकडे साठा पडून, सरकारी केंद्रांवर मात्र खडखडाट

सरकारी लसीकरण केंद्रांवर मागील काही महिन्यांपासून लसींचा तुटवडा कायम आहे. खासगी रुग्णालयांबाबत मात्र हे चित्र अगदी उलट आहे. कारण खासगी केंद्रांवर 41 टक्के साठा (Vaccine Stock at Private Centers) पडून आहे.

सरकारी लसीकरण केंद्रांवर मागील काही महिन्यांपासून लसींचा तुटवडा कायम आहे. खासगी रुग्णालयांबाबत मात्र हे चित्र अगदी उलट आहे. कारण खासगी केंद्रांवर 41 टक्के साठा (Vaccine Stock at Private Centers) पडून आहे.

सरकारी लसीकरण केंद्रांवर मागील काही महिन्यांपासून लसींचा तुटवडा कायम आहे. खासगी रुग्णालयांबाबत मात्र हे चित्र अगदी उलट आहे. कारण खासगी केंद्रांवर 41 टक्के साठा (Vaccine Stock at Private Centers) पडून आहे.

मुंबई 02 ऑगस्ट : संपूर्ण देशभरात कोरोना (Coronavirus in India) महामारीनं थैमान घातलेलं आहे. अशात कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी सरकारकडून लसीकरणावर (Corona Vaccination) अधिक भर दिला आहे. विविध माध्यमांतून नागरिकांना लस घेण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती अगदीच उलट आहे. कारण, सरकारी लसीकरण केंद्रांवर मागील काही महिन्यांपासून लसींचा तुटवडा कायम आहे. यामुळे, मोफत लसीकरणासाठी (Free Vaccination) नागरिकांना अगदी पहाटेपासूनच रांगेत उभा राहावे लागत आहे. खासगी रुग्णालयांबाबत मात्र हे चित्र अगदी उलट आहे. कारण खासगी केंद्रांवर 41 टक्के साठा (Vaccine Stock at Private Centers) पडून आहे.

समोर आलेल्या आकडेवारीनुसार, देशभरातील खासगी आरोग्य संस्थांनी खरेदी केलेल्या लशींपैकी तब्बल 24 टक्के साठा हा केवळ महाराष्ट्रातील कंपन्यांनी खरेदी केला आहे. सरकारनं 18 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी मोफत लशीची घोषणा केली खरी मात्र अनियमित पुरवठ्यामुळे सरकारी केंद्रांवर लशीसाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे. मोफत लसीकरणामुळे सरकारी रुग्णालयातील लसीकरणाकडे नागरिकांचा कल वाढला आहे. तर, खासगी रुग्णालये मात्र लशींची साठेबाजी करत असल्याचं चित्र आहे. लोकसत्तानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

VIDEO : सोलापूरकरांना नाही कोरोनाची भीती; धार्मिक कार्यक्रमात मोठी गर्दी

राज्यातील लसीकरणाचा साठा पाहायचा झाल्यास 1 मे ते 14 जुलै या काळात खासगी आरोग्य संस्थांनी कोवव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींच्या मिळून एकूण 80 लाख 44 हजार 190 लसमात्रा खरेदी केल्या. यातील केवळ 47 लाख 34 हजार 950 लसमात्रा दिल्या गेल्या आहेत, तर सुमारे 33 लाख लशी शिल्लक आहेत. एकंदरीतच एकूण आकडा पाहता राज्यात खासगी रुग्णालयांकडे 41 टक्के साठा शिल्लक आहे.

देशातील आकडेवारी पाहायची झाल्यास, खासगी केंद्रांकडे सुमारे 1 कोटी 18 लाख म्हणजे 41 टक्के लससाठा शिल्लक आहे. विशेष बाब म्हणजे अरुणाचल प्रदेशामध्ये खासगी रुग्णालयांनी खरेदी केलेल्या 50 हजार लशींच्या मात्रांपैकी एकाही मात्रेचा वापर अद्याप झालेला नाही. तर, हिमाचल प्रदेशकडे 91 टक्के, जम्मू काश्मीर 86 टक्के, चंदीगज 67 टक्के, मणिपूर 83 टक्के, तेलंगणा 64 टक्के, दिल्ली 60 टक्के, तर पंजाब आणि उत्तर प्रदेशमधील खासगी रुग्णालयांमध्ये 50 टक्के लसमात्रा पडून आहेत.

मोदी सरकारने जाहीर केली Corona Hotspot ठरणारी 10 राज्य! महाराष्ट्राचाही समावेश

सरकारी केंद्रांवर मात्र नागरिकांना लशीसाठी पहाटेपासूनच रांगेत उभा राहावं लागत आहे. अनेकदा दिवसभर रांगेत उभा राहूनही लसीकरण होत नसल्याची स्थिती आहे. परिणामी, अनेक नागरिकांना सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या मोफत लसीकरणाचा फायदाच मिळत नसून खासगी रुग्णालयांमध्ये जात लसीकरणासाठी पैसे मोजावे लागत आहेत.

First published:
top videos

    Tags: Corona vaccination, Corona vaccine