मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Covishield च्या 2 डोसमधील अंतर वाढवलं, Covaxin मधील का नाही? सरकारनं दिलं स्पष्टीकरण

Covishield च्या 2 डोसमधील अंतर वाढवलं, Covaxin मधील का नाही? सरकारनं दिलं स्पष्टीकरण

कोव्हीशील्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर अनेकदा बदलण्यात आलं आहे. त्याचवेळी देशातील भारत बायोटेक (Bharat Biotech) आणि आयसीएमआर (ICMR) यांनी विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन लशीच्या दोन डोसमधील अंतर मात्र आतापर्यंत एकदाही बदलण्यात आलेलं नाही. जाणून घ्या यामागचं कारण

कोव्हीशील्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर अनेकदा बदलण्यात आलं आहे. त्याचवेळी देशातील भारत बायोटेक (Bharat Biotech) आणि आयसीएमआर (ICMR) यांनी विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन लशीच्या दोन डोसमधील अंतर मात्र आतापर्यंत एकदाही बदलण्यात आलेलं नाही. जाणून घ्या यामागचं कारण

कोव्हीशील्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर अनेकदा बदलण्यात आलं आहे. त्याचवेळी देशातील भारत बायोटेक (Bharat Biotech) आणि आयसीएमआर (ICMR) यांनी विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन लशीच्या दोन डोसमधील अंतर मात्र आतापर्यंत एकदाही बदलण्यात आलेलं नाही. जाणून घ्या यामागचं कारण

पुढे वाचा ...

    नवी दिल्ली, 22 मे: देशभर सर्वत्र आता कोविड-19 वर (Covid-19) मात करण्यासाठी लस (Vaccine) देण्याची मोहीम सुरु झाली आहे. देशातच निर्माण करण्यात येणाऱ्या कोव्हॅक्सिन (Covaxin) आणि कोव्हीशील्ड (Covishield) या दोन लस दिल्या जात असून, त्याचे दोन डोस (Two Doses) देण्यात येत आहेत. सध्या मात्र लसीची उपलब्धता कमी झाल्यानं यात काहीसा खंड पडत आहे. त्यापैकी कोव्हीशील्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर अनेकदा बदलण्यात आलं आहे. आधी या लशीच्या दोनडोसमधील अंतर 3 ते 4आठवडे ठेवण्यात आलं होतं आता ते 12 ते 16आठवडे करण्यात आलं आहे. त्याचवेळी देशातील भारत बायोटेक (Bharat Biotech) आणि आयसीएमआर (ICMR) यांनी विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन लशीच्या दोन डोसमधील अंतर मात्र आतापर्यंत एकदाही बदलण्यात आलेलं नाही.

    यामागचे नेमके कारण काय याबाबत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आयसीएमआरचे प्रमुख डॉ. बलराम भार्गव (Dr. Balram Bhargava) यांनी कोव्हॅक्सिनच्या दोन डोसमधील अंतर कावाढवण्यात आलेलं नाही यांचे स्पष्टीकरण दिलं आहे.

    हे वाचा-मुलांमध्ये धोका वाढला; कर्नाटकात 9 वर्षाखालील 40 हजार मुलांना कोरोनाची लागण

    कोणत्याही लशीच्या दोन डोसमधील अंतर किती असावं हे पहिल्या डोसच्या प्रभाव किती काळ टिकून राहतो यावर आधारीत असतं. कोव्हीशील्डच्या पहिल्या डोसची प्रतिबंध क्षमता 12 आठवडे राहते असं सिद्ध झालं आहे. त्यामुळं या लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्यात आलं आहे. कोव्हॅक्सिनबाबत मात्र असं कोणतंही संशोधनपुढं आलेलं नाही. त्यामुळं त्याच्या दोन डोसमधील अंतरात बदल करण्यात आलेला नाही, असं डॉ. बलराम भार्गव यांनी नुकतंच स्पष्ट केलं.

    नवीन लस आहे आणखी बदल अपेक्षित

    कोरोना विषाणूवरील प्रतिबंधात्मक लसी गेल्या डिसेंबर महिन्यातच आल्या आहेत. त्यामुळं त्यात अनेक बदल होत आहेत. आणखी बदल होण्याचीही शक्यता आहे.कोव्हीशील्डच्या पहिल्या डोसनंतर प्रतिबंधात्मक क्षमतेत फरक पडतो पण कोव्हॅक्सिनच्या दोन्ही डोस घेतल्यानंतर रोग प्रतिकारक शक्ती उच्चस्तरावर पोहोचते, अशी माहिती समोर आली आहे.

    हे वाचा-कोरोनापासून लहान मुलांना वाचवण्यासाठी धडपड; काय आहे सरकारचा प्लॅन?

    कोव्हॅक्सिनचं उत्पादन वाढवलं जात आहे

    आयसीएमआरच्या सहकार्यानं भारत-बायोटेक ही औषध निर्माती कंपनी आता कोव्हॅक्सिनचे उत्पादन (Covaxin Production) वाढवत आहे. दरवर्षी 100 कोटी डोस निर्माण करण्याचे त्यांचे नियोजन असून, त्यादृष्टीनं उत्पादन वाढवण्यावर भर दिला जात आहे. कंपनीच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील (Gujrat) अंकलेश्वर इथं असलेली भारत बायोटेकच्या मालकीची चिरोन बेहरींग व्हॅक्सिन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी 20 कोटी डोस बनवणार आहे.

    First published:

    Tags: Corona patient, Corona vaccination, Corona vaccine, Corona vaccine in market, Coronavirus