नवी दिल्ली, 27 मे: भारत देश सध्या कोरोना व्हायरस (Corona Virus) च्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. अशातच लसीकरणा (Vaccination In India)बाबत मोठा बदल होणार आहे. आता नागरिक थर्ड पार्टी अॅप्सच्या माध्यमातून कोविड लसीकरणासाठी स्लॉट बुक आणि नोंदणी करु शकणार आहेत. केंद्र सरकारनं को- विन (CO-Win)साठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, थर्ड पार्टीला त्याच्या अॅपच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन, शेड्यूलिंग आणि व्हॅक्सीनेशच्या व्यवस्थापनासाठी परवानगी दिली आहे.
देशात लसीकरणाचा तुटवडाही जाणवत आहे. केंद्र सरकारनं हा निर्णय अशावेळी घेतला आहे. जेव्हा देशात कोविड लशींचा अभाव जाणवत आहे. या तुटवड्यामुळे लोकांना Co-WIN वस लसीकरणासाठी स्लॉट शोधणं किंवा बुकिंग करणंही कठीण जात आहे.
या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नवीन API अॅप डेवलपर्संना रजिस्टर करणं, अपॉइंटमेंट शेड्यूल करणं आणि अॅपवरुन कोविड लसीकरण आणि सुविधा व्यवस्थापित करण्याची परवानगी मिळणार आहे.
हेही वाचा- ''माझं नाव सनी, मी बाहेर जाऊ शकतो का?'', प्रश्न विचारणाऱ्याला मुंबई पोलिसांचा हटके रिप्लाय
Co-WIN साठी बनवण्यात आलेल्या मास्टर डेटाबेसमध्ये डेवलपर्संकडून काही बदल केले जातील. आतापर्यंत सरकारच्या आरोग्य सेतू आणि उमंग हे केवळ दोन अॅप होते. या दोन्ही अॅपवरुन यूजर्स कोविड- 19 लसीकरणासाठी अपॉइंटमेंट रजिस्टर आणि स्लॉट बुक करु शकत होते. दुसरीकडे थर्ड पार्टी अॅप्स अपॉइंटमेंट स्लॉटची उपलब्धता दर्शवतील.
हेही वाचा- ...अन् मुख्यमंत्र्यांच्या शिक्षिकेला अखेर दिलासा, केलेली 'ती' विनंती मान्य
सरकारनं डेवलपर्ससाठी Co-WIN च्या प्रायव्हेट एपीआय रजिस्ट्रेशनसाठी ईमेल सुद्धा बनवला आहे. Co-WINचे पब्लिक API चा वापर करणारे डेवलपर्ससाठी रजिस्ट्रेशन अनिवार्य असू शकते, असं मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Central government, Corona vaccination, Corona virus in india, Coronavirus