मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

पाण्यामार्फतही पसरू शकतो coronavirus; काय सांगतात तज्ज्ञ?

पाण्यामार्फतही पसरू शकतो coronavirus; काय सांगतात तज्ज्ञ?

तज्ज्ञांच्या मते, कोविड-19 चं (Covid-19) संक्रमण कमी करण्यासाठी पाणी (water) स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे.

तज्ज्ञांच्या मते, कोविड-19 चं (Covid-19) संक्रमण कमी करण्यासाठी पाणी (water) स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे.

तज्ज्ञांच्या मते, कोविड-19 चं (Covid-19) संक्रमण कमी करण्यासाठी पाणी (water) स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे.

  • Published by:  Manoj Khandekar

मुंबई, 21 एप्रिल : कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) बचावासाठी प्रत्येक वस्तू, पृष्ठभाग स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. विविध पृष्ठभागावर हा व्हायरस एका विशिष्ट काळासाठी जिवंत राहतो. तर हवेतही हा व्हायरस काही तास तग धरू शकतो, असं काही अभ्यासात दिसून आलं आहे. त्यात आता हा व्हायरस पाण्यातही (water)असू शकतो असा दावा संशोधकांनी केला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनाव्हायरस पाण्यामार्फत पसरत नाही, असं सांगितलं आहे. मात्र केडब्लूआर (KWR) जर्नलमध्ये नेदरलँडच्या शास्त्रज्ञांचा अभ्यास प्रसिद्ध करण्यात आला आहे, ज्यात त्यांनी वॉटर ट्रिटमेंट प्लांटमध्ये कोरोनाव्हायरसचे 3 सक्रिय जिन्स मिळाल्याचं म्हटलं आहे.

हे वाचा - आईचं दूध नवजात बाळासाठी संजीवनी, जीवघेण्या व्हायरसपासून करतं संरक्षण

शिवाय यूके सेंटर फॉर एकोलॉजी अँड हायड्रोलॉजीच्या मते, कोरोनाव्हायरस अस्वच्छ पाण्यात काही वेळ जिवंत राहू शकतो. हा व्हायरस पाण्यात किती वेळ जिवंत राहू शकतो हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

एन्व्हायरमेंटल सायन्स : वॉटर रिसर्च अँड टेक्नॉलॉजीमध्येही (Environmental science : Water research and technology) अशाच मिळत्याजुळत्या आशयाचा रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया (University of california) आणि युनिव्हर्सिटी ऑफ सलेर्नो (University of Salerno) च्या शास्त्रज्ञांचा या अभ्यासात सहभाग होता. SARS पाण्यात जिवंत राहतो का आणि किती वेळ? हे पाहण्यात आलं.

हे वाचा - जीवघेणं क्‍लोरीन डाइऑक्‍साइड कोरोनाव्हायरसवर औषध; काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं?

त्यावेळी दिसून आलं की, 2002-03 साली सार्सचा उद्रेक झाला तेव्हा पाण्याचा पाईल लिकेज झाल्याने पाण्याचे थेंब ऐरोसॉलच्या माध्यमातून हवेत पोहोचले आणि त्यानंतर प्रकरणांमध्येही झपाट्याने वाढ झाली. हाँगकाँगमध्ये करण्यात आलेल्या या अभ्यासात पाणी आणि कोरोनाव्हायरसमध्ये थेट संबंध असल्याचं दिसून आलं होतं.

नव्या कोरोनाव्हायरसचा विचार करता आतापर्यंत तरी हा व्हायरस पाण्यामार्फत पसरल्याचं प्रकरण समोर आलेलं नाही. मात्र तज्ज्ञांच्या मते, एका जातीचे सर्व व्हायरस एकाच प्रकारे प्रतिक्रिया देतात. त्यामुळे कोरोनाव्हायरसही पाण्यामार्फत पसरू शकतो. पाण्याच्या फवा-यामार्फत हवेत पसरू शकतो. याला शॉवरहेड्स एयरोसोल ट्रान्समिशन (showerhead aerosol transmission) असं म्हणतात.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published:

Tags: Coronavirus