Home /News /coronavirus-latest-news /

Corona vaccine घेणाऱ्याला मिळणार iPhone; महापालिकेची भन्नाट ऑफर

Corona vaccine घेणाऱ्याला मिळणार iPhone; महापालिकेची भन्नाट ऑफर

कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी महापालिकेकडून अशी ऑफर देण्यात आली आहे.

    अहमदाबाद, 30 नोव्हेंबर : जगभरात आता कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची (Omicron) दहशत आहे. अशात काही देशांनी कोरोना लशीच्या (Corona vaccine) दोन डोसनंतर बुस्टर डोसही द्यायला सुरू केले आहेत. भारतातही लवकरच बुस्टर डोस दिले जाणार आहेत. पण अद्यापही काही लोक लस घेण्यास घाबरत आहेत किंवा टाळाटाळ करत आहेत. लसीकरणाचा वेग वाढावा, लोकांनी स्वतः पुढाकार घेऊन लस घ्यावी यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न केले आहेत. कोरोना लसीकरणासाठी वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जात आहेत. अशीच एक ऑफर म्हणजे कोरोना लस घेणाऱ्याला आयफोन (iPhone) मिळणार नाही (Get iphone after corona vaccination). आपल्याकडे आयफोन असावा असं अनेकांना वाटतं. आता हाच आयफोन महापालिकेने ऑफर केला आहे. पण त्यासाठी कोरोना लस घेणं गरजेचं आहे. अहमदाबाद महापालिकेने लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी ही ऑफर दिली आहे. कोरोना लशीचा दुसरा डोस घेणाऱ्यांना आयफोन दिला जाणार आहे. 1 ते 7 डिसेंबर या कालावधीत जे नागरिक कोरोना लशीचा दुसरा डोस घेतील त्यांचा यात समावेश केला जाणार आहे. या नागरिकांपैकी एक लकी विजेता ठरवला जाणार आहे, ज्याला हा आयफोन मिळणार आहे. हे वाचा - भारतातही देणार कोरोना लशीचा बुस्टर डोस; ओमिक्रॉनच्या संकटात सरकारचा मोठा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दुसरा डोस वेळेत घेतला गेला नाही तर त्या लशीचा आवश्यक तितका परिणाम दिसणार नाही. त्यामुळे त्रास होऊ शकतो. म्हणूनच लशीचे दोन डोस निर्धारित केलेल्या अंतराने घेणं गरजेचं आहे. तसं केल्यानंतर लशीचा पुरेसा प्रभाव दिसतो. कोरोनाप्रतिबंधक लशीचा एक डोस (Single Does) घेतला असेल, तर मृत्यूचा धोका 82 टक्क्यांनी घटतो; तसंच लशीचे दोन्ही डोसेस (Double Doses) घेतलेले असतील, तर मृत्यूचा धोका (Death) 95 टक्क्यांनी घटतो, असं या अभ्यासातून (ICMR Study) समोर आलं आहे. भारतातही बुस्टर डोसची तयारी दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आल्यानं जगभरातले देश सतर्क झाले आहेत. या व्हेरिएंटचा प्रसार रोखण्यासाठी तातडीनं पावलं उचलली जात आहेत. भारतानेदेखील या व्हेरिएंटचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. सरकार गंभीर आजार असलेल्या (Severe Disease) आणि कमकुवत इम्युनिटी (Low Immunity) असलेल्या गटाला लशीचा बुस्टर डोस देण्याबाबत नवं धोरण आणणार आहे. नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप (NTAG) दोन आठवड्यांत हे धोरण तयार करणार आहे. तसंच एनटीएजी देशातल्या 44 कोटी बालकांच्या लसीकरणासाठी नवं धोरणदेखील आणणार आहे, अशी माहिती देशाच्या कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी दिली. हे वाचा - EXCLUSIVE: ओमायक्रॉनचा धोका असतानाच Gavi च्या प्रमुखांनी व्यक्त केली 'ही' चिंता एनडीटीव्हीशी बोलताना डॉ. एन. के. अरोरा म्हणाले, "कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटवर सध्या उपलब्ध असलेल्या लशी (Vaccine) किती परिणामकारक ठरू शकतात, याबाबतची तपासणी देशातल्या अनेक प्रयोगशाळांमध्ये सुरू आहे. याबाबतची ठोस माहिती स्पष्ट होण्यासाठी किमान 2 आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. त्यानंतरच कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड किंवा अन्य कोणतीही लस या व्हेरिएंटविरोधात किती सक्षम आहे, हे समजू शकेल"
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona, Corona vaccination, Coronavirus, Gujrat, Sanjeevani

    पुढील बातम्या