मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /भारतात Corona Virusची दुसरी लाट पसरण्यामागं 'हे' होतं महत्त्वाचं कारण; WHOची माहिती

भारतात Corona Virusची दुसरी लाट पसरण्यामागं 'हे' होतं महत्त्वाचं कारण; WHOची माहिती

त्यामुळे फुकेत सारख्या बेटांवर सर्वातआधी बेटावरील 70% जनतेला व्हॅक्सिनेशन करण्यावर लक्ष केंद्रित केलं गेलं आहे. त्यानंतर हा प्रदेश पर्यटकांसाठी देखील खुला होणार आहे.

त्यामुळे फुकेत सारख्या बेटांवर सर्वातआधी बेटावरील 70% जनतेला व्हॅक्सिनेशन करण्यावर लक्ष केंद्रित केलं गेलं आहे. त्यानंतर हा प्रदेश पर्यटकांसाठी देखील खुला होणार आहे.

डेल्टा (Delta) व्हेरियंटचे एक विषाणू स्वरूपच (स्ट्रेन) फक्त घातक असून इतर दोन प्रकारांचा धोका कमी झाला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) गुरुवारी झालेल्या बैठकीत सांगितले आहे.

नवी दिल्ली, 04 जून: भारतात ऑक्टोबर 2020 मध्ये आढळलेल्या B.1.617.2 व्हेरियंटला डेल्टा (Delta) व्हेरियंट म्हटलं गेलं आहे. तर, दुसऱ्या B.1.617.1 स्ट्रेनचं नामकरण कप्पा (Kappa) असं केलं गेलं आहे. भारतासोबतच इतर देशांमध्ये आढळलेल्या व्हेरियंटचंही नामकरण केलं गेलं आहे. आता यातील डेल्टा (Delta) व्हेरियंटचे एक विषाणू स्वरूपच (स्ट्रेन) फक्त घातक असून इतर दोन प्रकारांचा धोका कमी झाला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) गुरुवारी झालेल्या बैठकीत सांगितले आहे.

भारतात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार उडाला. दुसऱ्या लाटेपाठीमागे भारतात कोरोना विषाणूचे B.1.617 हे बदलले स्वरुप कारणीभूत होते, असे सांगितले आहे. हे विषाणू स्वरुप तीन म्यूटेंट वेरिएंट आहे. कारण या स्वरुपातून विषाणू तीन लिनिएजमध्ये पसरला जात आहे.

जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, भारतात विषाणूची दुसरी लाटे पसरण्यापाठीमागे डेल्टा वेरियंटची महत्त्वाची भूमिका होती. डेल्टा वेरियंट अल्फापेक्षा 50 टक्के ज्यास्त संसर्गजन्य आहे. त्यामुळे विषाणू संक्रमण वेगाने होते.

हे वाचा - महाविकास आघाडीत सगळं आलबेल नाही, तीन पक्षांत अंतर्गत मतभेद?

मे महिन्याच्या सुरुवातीलाच भारतात आढळलेल्या कोरोना स्ट्रेनला भारतीय म्हणण्यावरून वाद झाला होता. केंद्र सरकारनं त्या बातम्यांवर आक्षेप घेतला होता. ज्यात जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाच्या B.1.617 व्हेरियंटला भारतीय व्हेरियंट नाव दिल्याचं म्हटलं गेलं होतं. सरकारनं म्हटलं होतं, की WHO नं कधीही भारतीय असा उल्लेख केलेला नाही. अनेक माध्यमांनी असं वृत्त दिलं आहे, की जागतिक आरोग्य संघटनेनं B.1.617 व्हेरियंट जागतिक समुदायासाठी घातक असल्याचं म्हटलं आहे. मात्र, या बातम्या खोट्या असल्याचं WHO नं स्पष्ट केलं होतं.

हे वाचा - प्रसिद्ध अभिनेत्रीचा मॉर्फ पॉर्न व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल; पोलीस घेतायेत निर्मात्याचा शोध

भारतीय व्हेरियंट या शब्दावर सरकारनं आक्षेप घेतल्यानंतर WHO नंही यावर प्रतिक्रिया दिली होती. WHO नं ट्विटरवर म्हटलं होतं, की जागतिक आरोग्य संघटना कोणत्याही व्हेरियंटला देशाच्या नावावरून नाव देत नाही. संघटना व्हायरसच्या स्वरुपाला त्याच्या शास्त्रीय नावानेच संबोधित करते आणि इतरांनीही असंच करावं, अशी आशा आहे.

First published:
top videos

    Tags: Corona spread, Corona updates, Corona virus in india, Coronavirus