मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /आवाजावरुनही करू शकता Omicron चं निदान; 'हे' आहे पहिलं लक्षण

आवाजावरुनही करू शकता Omicron चं निदान; 'हे' आहे पहिलं लक्षण

डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत ओमायक्रॉनची लक्षणं लवकर दिसून येतात, असं निदर्शनास येत आहे. ओमायक्रॉनची लागण होण्यापूर्वीच तुम्हाला त्याची लक्षणं जाणवू लागतात

डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत ओमायक्रॉनची लक्षणं लवकर दिसून येतात, असं निदर्शनास येत आहे. ओमायक्रॉनची लागण होण्यापूर्वीच तुम्हाला त्याची लक्षणं जाणवू लागतात

डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत ओमायक्रॉनची लक्षणं लवकर दिसून येतात, असं निदर्शनास येत आहे. ओमायक्रॉनची लागण होण्यापूर्वीच तुम्हाला त्याची लक्षणं जाणवू लागतात

  नवी दिल्ली 27 डिसेंबर : जगावर असलेलं कोरोना महामारीचं (Corona Pendamic) संकट पुन्हा गडद होण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरसच्या 'ओमायक्रॉन' (Omicron) या नवीन व्हेरिएंटची दहशत सर्वत्र पसरण्यास सुरुवात झाली आहे. ओमायक्रॉनबाबत जगभरातून भीतीदायक आकडेवारी समोर येऊ लागली आहे. युरोपमध्ये तर ओमायक्रॉननं अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. भारतातदेखील याचा शिरकाव झाला असून तो वेगाने पसरत आहे. भारतात आतापर्यंत ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 400 पार गेली आहे.

  ओमायक्रॉन हा डेल्टा व्हेरियंटपेक्षा (Delta variant) जवळजवळ तिप्पट वेगाने पसरतो आहे, त्यामुळे केंद्र सरकारनी (Central Government) सर्व राज्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर काही राज्यांमध्ये नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनपूर्वी प्रतिबंध (Covid restriction) लावण्यास सुरुवात झाली आहे. डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत ओमायक्रॉनची लक्षणं लवकर दिसून येतात, असं निदर्शनास येत आहे. ओमायक्रॉनची लागण होण्यापूर्वीच तुम्हाला त्याची लक्षणं जाणवू लागतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे असं म्हटलं जात आहे की, ओमायक्रॉनच्या लक्षणांना तुम्ही ऐकू शकता. झी न्यूजनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

  मोठी बातमी: 230 दिवस शरीरात राहतो Corona Virus?, 'या' अवयवांवर करतो परिणाम

  तज्ज्ञांच्या मते, ओमायक्रॉनच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये (Symptoms) घशाच्या खवखवण्याचा समावेश होतो. तुमच्या घशाला आतून सतत काहीतरी टोचल्याची (Scratchy Throat) जाणीव होते. डेल्टा व्हेरिएंटमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर लोकांना घसा खवखवण्याची (Soar Throat) समस्या होत असे. दक्षिण आफ्रिकेतील डिस्कव्हरी हेल्थचे मुख्य कार्यकारी रायन रोच (Ryan Roach) म्हणाले की, ओमायक्रॉनचा त्रास असलेल्या लोकांना नाक चोंदणं, कोरडा खोकला आणि पाठीच्या खालच्या भागात दुखणं अशा समस्यांना तोंड द्यावं लागत आहे.

  द सनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जर तुमचा आवाज खराब झाला असेल. जर तुम्हाला ओरडता येत नसेल किंवा गाणं गाता येत नसेल तर ही चिंतेची बाब असू शकते. कारण, हे ओमायक्रॉनचं सर्वात सुरुवातीचं लक्षण आहे. त्यामुळं तुमच्या आवाजात काही बदल झाला आहे का? हे तुमच्या पटकन लक्षात आलं पाहिजे. जेणेकरून चाचणी करून घेता येईल

  ओमायक्रॉन हा डेल्टा व्हेरिएंटपेक्षा कमी धोकादायक आहे, असा दावा काही रिपोर्टमध्ये करण्यात आलेला आहे. युनायटेड किंग्डममधील पहिल्या अधिकृत अहवालानुसार, ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या डेल्टापेक्षा 50 ते 70 टक्क्यांनी कमी आहे.

  सुट्टीच्या दिवशी नागपुरातून आली चिंता वाढवणारी बातमी, चार दिवसात बदलली परिस्थिती

  युकेएचएसएचे (UKHSA) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जेनी हॅरिस म्हणाले की, युकेएचएसएनं सर्व ब्रिटिश नागरिकांना विनंती केली आहे, ज्यांनी अद्याप बूस्टर डोस (Booster dose) घेतलेला नाही, त्यांनी तो लवकरात लवकर घ्यावा. कारण, ओमायक्रॉनला प्रतिबंध करण्याचा तो सर्वोत्तम मार्ग आहे.

  लस घेण्यासोबतचं प्रत्येकानं आपल्या प्रकृतीमध्ये होणाऱ्या लहान-मोठ्या बदलांकडं बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे. ओमायक्रॉनच्या लक्षणांपैकी असलेला एखादा जरी बदल शरीरात जावल्यास तत्काळ तपासणी करून घेतली पाहिजे.

  First published:

  Tags: Corona spread, Corona updates