नवी दिल्ली, 27 डिसेंबर : कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा सामना करण्यासाठी जगातील कित्येक देशांमध्ये आधीपासूनच कोरोना लसींचा बूस्टर डोस (Corona Vaccine Booster dose) देण्यात येतो आहे. अर्थात, भारतात याला ‘बूस्टर डोस’ न म्हणता; ‘प्रिकॉशन डोस’, म्हणजेच खबरदारीचा डोस (Precaution Dose) म्हटले जात आहे. 25 डिसेंबरला याबाबत घोषणा करताना पंतप्रधानांनीच हा शब्दप्रयोग वापरला. आता तुम्ही म्हणाल ‘प्रिकॉशन डोस’ म्हणजे काय? त्यासाठी कोणती लस वापरणार? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं सविस्तर वाचा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी घोषणा केल्याप्रमाणे, येत्या 10 जानेवारीपासून (2022) आरोग्य आणि फ्रंटलाईन वर्कर्सना (Booster dose for elderly and frontline workers) खबरदारी म्हणून कोरोना लसीचा प्रिकॉशन डोस (India Booster dose) देण्यात येणार आहे. यासोबतच, गंभीर आजारांचा सामना करणाऱ्या 60 वर्षांवरील इतर रुग्णांनाही प्रिकॉशन डोस (Who can get Booster dose) देण्याची घोषणा करण्यात आली आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर एकीकडे जगभरात कोरोनाची चौथी लाट येताना दिसत आहे. तर, भारतामध्येही कित्येक राज्यांमध्ये प्रतिबंधात्मक निर्बंध लागू करूनही ओमिक्रॉन आणि कोरोनाचे रुग्ण (Omicron and Corona cases in India) वाढत आहेत. अशात लसीकरणाच्या या प्रिकॉशन डोसची घोषणा दिलासा देणारी आहे.
प्रिकॉशन डोसबाबत काही खास बाबी
1. ज्येष्ठ नागरिकांना प्रिकॉशन डोस (Who can get Precaution Dose) घ्यायचा असेल, तर गंभीर आजार असलेल्या प्रमाणपत्राची आवश्यकता असणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे सीईओ डॉ. आर. एस. शर्मा यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
2. यावर्षी सुरू झालेल्या लसीकरणावेळी ज्या आजारांना ‘गंभीर’ म्हटले गेले होते; त्याच आजारांच्या यादीचा उपयोग प्रिकॉशन डोसच्या (Corona Precaution Dose) वेळीही करण्यात येईल अशी शक्यता आहे.
3. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात म्हटल्याप्रमाणे, ज्येष्ठ नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व परवानगीनुसार प्रिकॉशन डोस देण्यात येईल.
4. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना लसीचा दुसरा डोस व प्रिकॉशन डोस यामध्ये 9 ते 12 महिन्यांचे अंतर ठेवण्यात येईल.
5. आर.एस. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या डोसच्या लाभार्थ्यांना बूस्टर डोस सर्टिफिकेट दिले जाईल.
6. मिळालेल्या माहितीनुसार, प्रिकॉशन डोससाठी कोणत्या लसीचा (Precaution Dose Vaccine) वापर करण्यात येईल याबाबत सरकार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेणार आहे. काही आरोग्य तज्ज्ञांच्या मते, प्रिकॉशन डोस हा पहिल्या दोन कोरोना लसींपेक्षा वेगळा असायला हवा. मात्र, सरकारने अद्याप मिक्स अँड मॅच पॉलिसीबाबत कोणतीही घोषणा केली नाही.
दरम्यान इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) दिलेल्या माहितीनुसार, जर सरकारने मिक्स अँड मॅच पॉलिसीचा अवलंब केला; तर देशात कोव्हॅक्सिन लसीची उपलब्धता वाढवावी लागणार आहे. कारण देशातील बहुतांश लोकांनी कोविशिल्ड या लसीचे पहिले दोन डोस घेतले आहेत.
अहमदनगर पाठोपाठ पुण्यात Corona चा विस्फोट, 13 विद्यार्थी पॉझिटिव्ह
प्रिकॉशन डोसचे उद्दिष्ट काय?
कित्येक तज्ज्ञांच्या मते, दुसऱ्या डोसनंतर शरीरात तयार झालेली इम्युनिटी ही सात ते आठ महिन्यांनंतर कमी होते. त्यामुळे ही इम्युनिटी पुन्हा तयार करण्यासाठी बूस्टर किंवा प्रिकॉशन डोसची गरज (Why Booster Dose is necessary) असते. कित्येक वैज्ञानिकांनी तर कोरोनाचे नवनवीन व्हेरियंट्स येत असल्या कारणाने, इथून पुढेही वर्षातून एकदा बूस्टर डोस घेण्याचे सुचवले आहे. दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटना (WHO on Booster dose) बूस्टर डोसचे तितके समर्थन करत नाहीये. याला कारण म्हणजे कित्येक देशांमध्ये अद्याप 40 टक्के जनतेला कोरोना लसीचा पहिला डोसही मिळाला नाहीये.
मोठी बातमी: 230 दिवस शरीरात राहतो Corona Virus?, 'या' अवयवांवर करतो परिणाम
दरम्यान, भारतातील 140 कोटी नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 25 डिसेंबरला दिली होती. यासोबतच, 3 जानेवारी (2022) पासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरणही (India Kids Vaccination) सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्याकडे बूस्टर वा प्रिकॉशन डोस लागू करण्याचा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona spread, Corona vaccine