Home /News /coronavirus-latest-news /

भन्नाट Start-up Idea: रुग्णांना बेड उपलब्ध करुन देण्यासाठी 2 पुणेकरांचा पुढाकार, वाचा सविस्तर

भन्नाट Start-up Idea: रुग्णांना बेड उपलब्ध करुन देण्यासाठी 2 पुणेकरांचा पुढाकार, वाचा सविस्तर

Pune Positive News: कोरोना रुग्णांची आणि नातेवाईकांची गरज लक्षात घेऊन पुण्यातील दोघांनी एक आगळं वेगळं स्टार्ट अप सुरू केलं आहे. कोरोनाच्या संकटकाळात रुग्णांच्या नातेवाईकांची मदत करण्यासाठी त्यांनी तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. ज्यामुळे अनेकांना मदत मिळत आहे.

पुढे वाचा ...
    पुणे, 04 मे: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रसह देशात कोरोना विषाणूनं (Coronavirus in Maharashtra) थैमान घातलं आहे. सध्या भारतात दिवसाला साडे तीन लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. तर महाराष्ट्रात दिवसाला जवळपास 60 हजार रुग्ण आढळत आहेत. या वाढत्या रुग्णांचा प्रचंड ताण आरोग्य प्रशासनावर येत आहे. अशा स्थितीत कोरोना बाधित रुग्णाला बेड मिळवणं अत्यंत अवघड जात आहे. रुग्णांच्या नातेवाईकांची ही गरज लक्षात घेऊन पुण्यातील दोघांनी एक आगळं वेगळं स्टार्ट अप सुरू केलं आहे. कोरोनाच्या संकटकाळात रुग्णांच्या नातेवाईकांची मदत करण्यासाठी त्यांनी तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील रिकाम्या बेड्सची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांची होणारी ससेहोलपट कमी होण्यास मदत होतं आहे. पुण्यातील 30 वर्षीय युवा उद्योजक चिन्मयी डुंबरे आणि त्यांचे सहकारी 38 वर्षीय आरिफ अमिरानी यांनी मिळून हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या स्टार्ट अपचं नाव इंडिया क्रिटिकल रिसोर्स नेटवर्क असं असून covidpune.com/reach या संकेतस्थळावर तुमच्या शहरातील रिकाम्या बेडबद्दलची सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. सकाळने याबाबत वृत्त दिलं आहे. युवा उद्योजक चिन्मयी डुंबरेनं तिच्या स्टार्टअपबद्दल माहिती देताना असं म्हटलं आहे की, 'अशा प्रकारची सुविधा सरकारी यंत्रणांकडून देखील पुरवली जात आहे. पण त्यामधील माहिती अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीची आहे. त्यामुळे त्याचा वापर करणं नागरिकांना थोडं अवघड जात आहे. त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीनं नागरिकांना सहज वापरता येईल, अशा पद्धतीनं या प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचबरोबर हे संकेतस्थळ स्थानिक भाषेतही उपलब्ध करू दिलं आहे. हे वाचा-भारतासाठी मदतीचा ओघ! 282 सिलेंडर, 60 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स कुवैतमधून दाखल सध्या हे संकेतस्थळ आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यातील एकूण 11 शहरातील रिकाम्या बेडची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पुणे, नाशिक, नागपूर, राजकोट, दिल्ली, सुरत, अहमदाबाद, बीड, गांधीनगर, बंगळुरू आणि वडोदरा या शहरातील विविध सरकारी आणि खाजगी रुग्णालये या वेब साइटशी जोडून घेण्यात आली आहे. या रुग्णालयातील उपलब्ध बेड्ससोबतचं रुग्णालयाचा पत्ता आणि फोन नंबर देखील उपलब्ध करून दिला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona patient, Pune

    पुढील बातम्या