Coronavirus In India: भारतासाठी मदतीचा ओघ! 282 सिलेंडर, 60 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स कुवैतमधून दाखल

Coronavirus In India: भारतासाठी मदतीचा ओघ! 282 सिलेंडर, 60 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स कुवैतमधून दाखल

भारतात कोरोनाव्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा (Coronavirus Second Wave in India) जबरदस्त फटका बसला आहे. या काळात ऑक्सिजन, बेड्स, औषधांचा तुटवडा नागरिकांसाठी दुहेरी मार ठरत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 मे: कोरोनाच्या संकटकाळात (Covid-19 Second Wave) भारताच्या मदतीसाठी विविध देश धावून आले आहेत. अनेक देशांकडून पाठवण्यात येणाऱ्या मदतीचा पुरवठा देशात दाखल होत आहे. देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वात मोठा फटका बसला आहे. आठवड्यापेक्षा जास्त कालावधीपासून दररोज 3 लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत त्यामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढला आहे. दररोज हजारो रुग्णांचा मृत्यू होत आहे. अनेक रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजनचा तुटवडा या समस्या गंभीर आहेत.

या दरम्यान कुवैतमधून देखील भारतात मदत दाखल झाली आहे. भारतात कुवैतमधून 282 सिलेंडर्स, 60 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स, व्हेंटिलेटर्स आणि अन्य काही मेडिकल सप्लाय आणणारी फ्लाइट मंगळवारी सकाळी भारतात दाखल झाली आहे.

याआधीच्या पाच दिवसांत दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर 300 टन कोव्हिड-19 मदत सामग्रीसह 25 उड्डाणे पोहोचली आहेत.  दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (डीआयएएल) च्या विमानतळ ऑपरेटर यांनी सोमवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की हा अंतरिम साठा आणि मदत साहित्याच्या वितरणासाठी विमानतळाने 3500 चौरस मीटर जागेवर 'जीवोदय गोडाऊन' बांधले आहे.

(हे वाचा-कोरोनातून बरे झालेल्यांसाठी लसीचा एक डोसही पुरेसा? वाचा काय सांगतात अभ्यासक)

निवेदनानुसार 28 एप्रिल ते 2 मेच्या दरम्यान पाच दिवसात साधारण 25 विमानांतून भारताच्या मदतीसाठी 300 टन कोव्हिड-19 सहाय्यता सामग्री भारतात पोहोचली आहे. निवेदनात दिलेल्या माहितीनुसार ही विमानं अमेरिका, ब्रिटन, संयुक्त अरब अमीरात, उझ्बेकिस्तान, थायलँड, जर्मनी, कतार, हाँगकाँग आणि चीनमधून दाखल झाली आहेत. यापैकी सर्वाधिक विमानांचं संचालन भारतीय वायुसेनेनं केलं आहे. ज्यामध्ये आयएल76, सी-130, सी-130, सी-5, सी-17 यांचा समावेश आहे. या 25 विमानांनी एकूण 5500 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स, 3200 ऑक्सिजन सिलेंडर, 9,28,000 पेक्षा जास्त मास्क, 1,36,000 रेमडेसिव्हीर इत्यादी सामग्री देशात पोहोचवली आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: May 4, 2021, 11:02 AM IST

ताज्या बातम्या