मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

भारतात दिसतंय त्यापेक्षा कोरोनाचं वास्तव वेगळंच? आता WHO नेसुद्धा व्यक्त केली चिंता

भारतात दिसतंय त्यापेक्षा कोरोनाचं वास्तव वेगळंच? आता WHO नेसुद्धा व्यक्त केली चिंता

भारतात राज्य आणि स्थानिक पातळीवर कोरोनाचा सखोल डेटा तपासण्याची गरज असल्याचं WHO ने म्हटलं आहे.

भारतात राज्य आणि स्थानिक पातळीवर कोरोनाचा सखोल डेटा तपासण्याची गरज असल्याचं WHO ने म्हटलं आहे.

भारतात राज्य आणि स्थानिक पातळीवर कोरोनाचा सखोल डेटा तपासण्याची गरज असल्याचं WHO ने म्हटलं आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 10 मे : भारतात (Coronavirus in India) कोरोनाची दुसरी लाट (Coronavirus second wave) थैमान घालते आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याचीही शक्यता वर्तवली जाते आहे. भारतातील कोरोना परिस्थितीबाबत आता जागतिक आरोग्य संघटनेनेही (World Health Organisation) चिंता व्यक्त केली आहे. भारतातील कोरोनाच्या एकूण आकड्यांमागे वास्तव दडत असल्याचं WHO ने म्हटलं आहे आणि राज्य आणि स्थानिक पातळीवर तळागाळातील डेटावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचं डब्ल्यूएचओने म्हटलं आहे.

भारतातील कोरोनाची प्रकरणं दिवसेंदिवस वाढत आहे. आता तर शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाची प्रकरणं वाढताना दिसत आहेत. त्यामुळे भारतातील कोरोनाची खरी परिस्थिती दिसते आहे, त्यापेक्षा वेगळीच असण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेनंही तशीच चिंता व्यक्त केली आहे.  जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन (Dr Soumya Swaminathan ) यांनी CNBC-TV18 एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी भारतातील कोरोना परिस्थितीबाबत काही शक्यत व्यक्त केली आहे.

हे वाचा - राज्यात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता; लवकरच कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार

डॉ. स्वामिनाथन यांनी सांगितलं, "भारतातील कोरोनाच्या उद्रेकामुळे भयंकर असे व्हेरिएंट्स निर्माण होण्याची शक्यता आहे. प्राथमिक डेटानुसार भारतातील व्हेरिएंट हा जास्त संसर्जन्य आहे. भारतात कोरोनाचा प्रसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा आहे. जागतिक आरोग्य संघटनेला भारतातील कोरोना प्रकरणं आणि मृत्यूच्या संख्येची चिंता आहे. जगात कोरोनाची प्रकरणं आणि मृत्यू नियंत्रणात आहेत पण दक्षिण आशियात नाही. दक्षिण-पूर्व आशियात भारतामुळे कोरोना प्रकरणं वाढताना दिसतं आहे. एकूण आकड्यांमध्ये प्रत्यक्ष परिस्थिती लपते आहे. आपल्याला राज्य आणि स्थानिक पातळीवर डेटा खोलवर तपासण्याची गरज आहे"

हे वाचा - Maharashtra fight back! कोरोनाचा 'पॉझिटिव्ह' रिपोर्ट; दिलासादायक आकडेवारी

भारतातील कोरोना लशीच्या प्रभावाबाबत सांगताना त्या म्हणाल्या, कोरोनाचा डबल म्युटंट कोरोना लशीला दाद देणार नाही, असा कोणताही डेटा नाही. सध्या भारतात उपलब्ध असलेल्या लशी इन्फेक्शन झालं तरी गंभीर आजारापासून आणि मृत्यूपासून संरक्षण देतात. तुम्हाला आयसीयूमध्ये जाण्याची गरज पडत नाही"

त्यामुळे तुम्ही पात्र असाल आणि जी कोणतीही लस उपलब्ध असेल ती घ्या, असं आवाहन डॉ. स्वामिनाथन यांनी केलं आहे.

First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus, Who