नवी दिल्ली, 18 जून : कोरोना (Corona latest update) साथीचा संसर्ग गेल्या काही महिन्यांपासून कमी झाला आहे. त्यामुळे कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले. त्याचबरोबर मास्क सक्तीही हटवण्यात आली. कोरोना नियंत्रणात येत असतानात आता पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव वाढत असल्याचं चित्र आहे. अद्यापही कोरोनाचं सावट घोंगावत असून नागरिकांच्या मनात भीती कायम आहे. कोरोना नियंत्रणात आला असताना मात्र पुन्हा एकदा कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येनं चिंतेत भर पाडली आहे.
भारतात एका दिवसात कोविड-19 चे 13,216 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर, देशात आतापर्यंत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 4,32,83,793 झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 68,108 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 113 दिवसांत पहिल्यांदाच देशात संसर्गाची 13,000 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नसल्याचं स्पष्ट दिसत आहे.
हे ही वाचा - पुन्हा कोरोना वाढतोय! लागण होऊ नये म्हणून आयुष मंत्रालयाच्या या टिप्स करा फॉलो
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत संसर्गामुळे आणखी 23 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर भारतात मृतांची संख्या 5,24,840 झाली आहे. गेल्या 24 तासांत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 5,045 ने वाढली आहे. देशात उपचाराधीत रुग्णांची संख्या 68,108 झाली आहे, जी एकूण प्रकरणांच्या 0.16 टक्के आहे. त्याच वेळी, संसर्गमुक्त रुग्णांचा राष्ट्रीय दर 98.63 टक्के आणि कोविड-19 मृत्यू दर 1.21 टक्के आहे. देशात आतापर्यंत एकूण 4,26,82,697 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.
हे ही वाचा - VIDEO: भररस्त्यात राखी सावंत बाॅयफ्रेंड आदिलसोबत झाली रोमॅन्टिक
संसर्गातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,26,90,845 झाली आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, देशभरात आतापर्यंत अॅंटी-कोविड-19 लसींचे 196 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, 7 ऑगस्ट 2020 रोजी देशात संक्रमितांची संख्या 20 लाख, 23 ऑगस्ट 2020 रोजी 30 लाख आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी 40 लाखांहून अधिक झाली होती. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून जगातील सर्व नागरिकांचं आयुष्य कोरोना या एकाच नावाभोवती फिरताना पहायला मिळालं आहे. कोरोना गेला आणि परत आला अशीच सध्या सर्वांची अवस्था झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona patient, Corona updates, Coronavirus cases