नवी दिल्ली, 19 जानेवारी : कोरोना प्रतिबंधक लसीचे (corona vaccine) दोन डोस घेतल्यानंतरही अनेकांना संसर्गाची लागण होत आहे. परिणामी देशात आता लसीचा बुस्टर डोस (corona booster dose) द्यायलाही सुरुवात केली आहे. यामुळे लस घेतल्यानंतर त्याचा प्रभाव (immunity) शरीरात किती काळ टिकतो? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर आता भारतात संशोधन झाले असून नवीन माहिती समोर आली आहे. रिसर्चनुसार सुमारे 30 टक्के म्हणजे दर 10 पैकी 3 लोकांमध्ये, कोरोना लसीचा प्रभाव फक्त 6 महिने टिकतो. यानंतर, त्यांच्याद्वारे तयार केलेली प्रतिकारशक्ती कमकुवत होते किंवा संपते. भारतात झालेल्या एका संशोधनातून हे तथ्य समोर आले आहे. हे संशोधन एआयजी हॉस्पिटल आणि एशियन हेल्थ केअर, हैदराबाद यांच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये 1600 हून अधिक लोक सहभागी झाले होते. या सर्व लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते.
एआयजी हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. नागेश्वरा रेड्डी म्हणाले की, लसीनंतर लोकांना मिळालेल्या प्रतिकारशक्तीचा काय परिणाम होतो हे जाणून घेणे हा या संशोधनाचा उद्देश होता. यासोबतच कोणत्या वयोगटात बूस्टर डोसची जास्त गरज आहे हे शोधून काढले. त्यांनी सांगितले की संशोधनात लोकांची अँटीबॉडी पातळी तपासण्यात आली. कोरोना विरूद्ध अँटीबॉडीची पातळी किमान 100 AU प्रति मिली असावी. यापेक्षा कमी असल्यास संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.
राज्यात कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढला; मात्र समोर आली ही दिलासादायक बाब
डॉ. नागेश्वर रेड्डी म्हणाले की रोग प्रतिकारशक्तीची पातळी किमान 100 AU प्रति मिली असावी. परंतु, ज्यांची पातळी 15 पर्यंत पोहोचली आहे, त्यांच्यामध्ये रोग प्रतिकारशक्ती संपली आहे असे मानले पाहिजे. डॉ. रेड्डी म्हणाले की, असे आढळून आले आहे की उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांची प्रतिकारशक्ती कमकुवत झाली आहे. असे सुमारे 6 टक्के लोक होते ज्यामध्ये रोग प्रतिकारशक्तीची पातळी किमान पातळीवर होती. वृद्धांच्या तुलनेत तरुणांमध्ये रोगप्रतिकारशक्ती दीर्घकाळ टिकते. 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये ही अँटीबॉडी 6 महिन्यांत कमी होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona vaccine, Vaccination