जाहिरात
मराठी बातम्या / देश / India Coronavirus Cases: भारतातही कोरोनाची भीती? लॉकडाऊन नाही पण हे नियम पुन्हा लागू होऊ शकतात

India Coronavirus Cases: भारतातही कोरोनाची भीती? लॉकडाऊन नाही पण हे नियम पुन्हा लागू होऊ शकतात

भारतातही कोरोनाची भीती?

भारतातही कोरोनाची भीती?

Coronavirus in India : जगभरात पुन्हा कोरोना संसर्गाने डोकं वर काढल्याने येत्या काही दिवसांत सरकार पुन्हा काही नियम लागू करू शकते.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 21 डिसेंबर : कोरोना च्या नव्या लाटेने जग पुन्हा एकदा हादरले आहे. चीन, जपान, ब्राझील, अमेरिकेसह अनेक देशांमध्ये संसर्ग झपाट्याने पसरू लागला आहे. एकट्या चीनमध्ये, पुढील तीन महिन्यांत 80 कोटींहून अधिक लोकांना संसर्ग होण्याची शक्यता आहे, तर 10 लाखांहून अधिक मृत्यू देखील अपेक्षित आहेत. एका अहवालानुसार, जगातील 10 टक्क्यांहून अधिक लोक पुढील तीन महिन्यांत संसर्गास बळी पडू शकतात. अशा परिस्थितीत भारतातही संसर्गाचा धोका वाढला आहे. जगभरातील वाढत्या केसेस पाहता केंद्र सरकार अलर्ट झालं आहे. येत्या काही दिवसांत सरकार पुन्हा काही नियम लागू करू शकते, ज्यांचे पालन करणे प्रत्येकासाठी बंधनकारक असेल. सरकार कोणते नियम लागू करू शकते? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनुसार, ‘आता आम्ही कोरोनाच्या प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहोत. भारतात सध्या फारसा धोका नाही, पण तरीही खबरदारी म्हणून सर्व प्रकारची खबरदारी घेतली पाहिजे. हे लक्षात घेऊन आम्ही कोविड प्रोटोकॉल पुन्हा लागू करण्याचा विचार करत आहोत. सार्वजनिक ठिकाणी पुन्हा मास्क अनिवार्य केले जाऊ शकतात: कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता, सार्वजनिक ठिकाणी पुन्हा मास्क घालणे अनिवार्य केले जाऊ शकते. विशेषतः ज्यांना कोरोनाची लक्षणे आहेत. उदाहरणार्थ, खोकला, सर्दी किंवा कोणत्याही प्रकारचे व्हायरल झाल्यास मास्क घालणे बंधनकारक असेल. वाचा - Corona update: देशात पुन्हा कोरोनाची नियामवली लागणार? आरोग्यमंत्र्यांनी बोलावली बैठक सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळावे लागतील: कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणेही बंद केले आहे. आता पुन्हा एकदा त्याची काटेकोर अंमलबजावणी होऊ शकते. विमानतळ, रेल्वे स्थानक आणि बस स्टँडवर रँडम चाचणी: दिल्ली, मुंबईसह सर्व प्रमुख विमानतळांवर रँडम कोरोना चाचणीची प्रक्रिया सुरू होऊ शकते. विशेषत: कोरोनाबाधित देशांतून परतणाऱ्या लोकांच्या तपासावर भर दिला जाईल. अशा लोकांची तपासणी केली जाईल आणि त्यांच्यात संसर्ग आढळल्यास, जीनोम सिक्वेन्सिंग केले जाईल आणि कोविडचे इतर प्रोटोकॉल पाळले जातील. त्याचप्रमाणे रेल्वे स्थानक आणि बसस्थानकांवरही रँडम चाचणी सुरू करण्याची तयारी सुरू आहे. बूस्टर डोसची प्रक्रिया वेगवान : आतापर्यंत 23 कोटींहून अधिक लोकांना कोरोना लसीचा बूस्टर डोस देण्यात आला आहे. आता त्यांची संख्या वेगाने वाढवण्यावर सरकारचा भर आहे. जास्तीत जास्त लोकांना बूस्टर डोस मिळावा अशी व्यवस्था केली जाईल. जीनोम सिक्वेन्सिंग : देशातील अनेक प्रयोगशाळांमध्ये पुन्हा जीनोम सिक्वेन्सिंगची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येथे कोरोना रुग्णांचे नमुने आणले जातात आणि संसर्गाचा नवीन प्रकार आला आहे का ते तपासले जाते. जेणेकरून वेळीच बचावासाठी पावले उचलता येतील. हेही वाचा :   चीनमधील कोरोना उद्रेक पाहून केंद्र सरकार सावध! राज्यांना अलर्ट जारी; आपल्याला किती धोका? टेस्टिंग, ट्रेसिंग आणि उपचारांवर लक्ष केंद्रित : भारतात कोरोनाची प्रकरणे वाढू नयेत यासाठी सरकारने टेस्टिंग, ट्रेसिंग आणि उपचारांच्या सूत्रावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, अधिकाधिक लोकांची चाचणी केली जाईल आणि जर एखाद्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळले, तर त्याच्या संपर्कात येणाऱ्या बहुतेक लोकांची चाचणी केली जाईल. यासोबतच कोरोना रुग्णांवर वेळेवर उपचार केले जातील.

News18लोकमत
News18लोकमत

भारतात आता कोरोनाची स्थिती काय आहे? दररोज सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या देशांच्या यादीत भारत 51 व्या क्रमांकावर आहे. मंगळवारी येथे तीन नवीन संक्रमित आढळले, तर कोणताही नवीन मृत्यू झाला नाही. भारतात आतापर्यंत 4.46 कोटी लोक संसर्गाच्या विळख्यात आले आहेत. त्यापैकी 4.41 कोटींहून अधिक लोक बरे झाले आहेत, तर 5.30 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात सध्या 4,527 रुग्ण उपचार घेत आहेत. सक्रिय प्रकरणांच्या बाबतीत भारत सध्या जगात 90व्या क्रमांकावर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात