नवी दिल्ली, 21 डिसेंबर : जगभरात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसची दहशत पसरली आहे. चीनमध्ये, हे ओमिक्रॉनचे सब-व्हेरियंट BF7 खूप वेगाने पसरत आहे, यामुळे येत्या काही दिवसांत 1.5 दशलक्षाहून अधिक मृत्यू होण्याची शक्यता आहे.
कोरोनाचा BF 7 प्रकार आता भारतातही दाखल झाला आहेत. गुजरातमधील वडोदरा येथील एका अनिवासी भारतीय महिलेमध्ये कोविड 19 च्या BF7 हा व्हेरिएंट आढळून आला आहे. तसेच गुजरातमध्ये कोरोनाची आणखी दोन प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये हाच व्हेरिएंट असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.
कोरोनाबाबत खूप मोठी बातमी समोर आली आहे. भारतातील BF.7 प्रकाराचे 4 रुग्ण आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. NITI आयोगाचे VK पॉल यांनी याबाबतची पुष्टी केली.
कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटबाबत सरकार सतर्क -
जगातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोना महामारीने डोके वर काढल्याच्या वृत्तानंतर भारत सरकार सतर्क झाले आहे. आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी बुधवारी देशातील कोरोनाच्या मुद्द्यावर अधिकारी आणि तज्ज्ञांची बैठक घेतली. यानंतर संबंधित विभाग आणि संस्थांना सतर्क करण्यात आले आहे. त्यांना दक्षता घेण्यास सांगितले आहे.
हेही वाचा - कोरोनाची धास्ती; 2 वर्ष मायलेकीनं स्वतःला घरात कोंडून घेतलं, शेवटी प्रकृती ढासळली अन्...
दरम्यान, भारतातील कोरोना स्थितीबाबत बोलताना आदर पुनावाला यांनी दिलासादायक माहिती दिली आहे. पुनावाला म्हणाले, की 'भारतात उत्कृष्ट व्हॅक्स कव्हरेज आहे. त्यामुळे आपल्याला काळजी करण्याची गरज नाही'. मात्र याचवेळी महाराष्ट्र अलर्टवर असल्याने राज्यातील नागरिकांना मात्र विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona spread, Corona updates, Corona virus in india, Coronavirus cases