मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

केरळमध्ये कोरोनाचा कहर, 24 तासांत 22 हजार रुग्ण, महाराष्ट्रातही वाढतायत आकडे

केरळमध्ये कोरोनाचा कहर, 24 तासांत 22 हजार रुग्ण, महाराष्ट्रातही वाढतायत आकडे

देशातील बहुतांश राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट (Second wave of corona virus) ओसरली असली, तरी केरळमध्ये (Kerala) मात्र कोरोनाचा उद्रेक कमी होत नसल्याचं दिसून येत आहे.

  • Published by:  desk news

मुंबई, 29 जुलै : देशातील बहुतांश राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट (Second wave of corona virus) ओसरली असली, तरी केरळमध्ये (Kerala) मात्र कोरोनाचा उद्रेक कमी होत नसल्याचं दिसून येत आहे. केरळमध्ये गेल्या 24 तासांत 22 हजारांपेक्षाही (22 thousand) अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर महाराष्ट्रातील (Maharashtra) नव्याने आढळणारी रुग्णसंख्यादेखील काही दिवसांपासून वाढत असल्याचं चित्र दिसू लागलं आहे.

केरळमध्ये कहर

केरळमध्ये गेल्या 24 तासांत 22 हजार 64 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 128 जणांचा मृत्यू झाला आहे. बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या आहे 16 हजार 649. याचाच अर्थ नव्यानं आढळणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचं प्रमाण कमी आहे. अशी परिस्थिती ही लाट अजूनही ओसरली नसल्याचं लक्षण मानलं जातं. केरळमधील स्थिती पाहता केंद्र सरकारच्या वतीनं 6 सदस्यांचं पथक पाठवण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातही चिंता

महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात असली तरी गेल्या काही दिवसांपासून आकडेवारीत सातत्यानं वाढ होत असल्याचं चित्र आहे. राज्यात गेल्या 24 तासात 7 हजार 242 नवे रुग्ण आढळले असून 190 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर 11 हजार 124 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या नव्याने आढळणाऱ्या रुग्णसंख्येच्या तुलनेत अधिक असणे, ही दिलासादायक बाब असली तरी नव्या रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत असल्याचं चित्र दिसू लागलं आहे.

हे वाचा -''शिवसेना स्वबळावर लढणार'', संजय राऊतांचं मोठं विधान

महाराष्ट्रात सध्या 78 हजार 562 ऍक्टिव्ह रुग्ण असून एकट्या नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक 1746 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. नव्याने आढळणाऱ्या रुग्णांमध्ये सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांचा समावेश असून एकंदर पश्चिम महाराष्ट्र कोरोनाने सर्वाधिक बाधित असल्याचं चित्र आहे.

First published:

Tags: Coronavirus, Coronavirus cases, Kerala, Maharashtra