खरे योद्धा! आरोग्य कर्मचाऱ्यांनी 45 सेमी बर्फातून रस्ता काढत वाचवले कोरोना रुग्णांचे प्राण

खरे योद्धा! आरोग्य कर्मचाऱ्यांनी 45 सेमी बर्फातून रस्ता काढत वाचवले कोरोना रुग्णांचे प्राण

लाहौल स्पिती भागात प्रचंड बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे रस्त्यावर 45 सेमी जाड बर्फाचा थर जमा झाला आहे.

  • Share this:

मंडी, 18 नोव्हेंबर : कोरोनाच्या या संकटकाळात कोव्हिड योद्ध्यांनी आपला जीव धोक्यात टाकून लोकांचा जीव वाचवला. अशीच एक घटना हिमाचल प्रदेशमधील मंडीमध्ये घडली आहे. लाहौल खोऱ्यातील दोन कोरोना रुग्णांना मंडीच्या नेर चौक वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्याची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. लाहौल स्पिती भागात प्रचंड बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे रस्त्यावर 45 सेमी जाड बर्फाचा थर जमा झाला आहे. त्यातूनही मार्ग काढत रुग्णवाहिकेचा चालक आणि मेडिकल अटेंडंटने प्राणांची बाजी लावत या रुग्णांना नेर चौकातील रुग्णालयात पोहोचवलं आणि त्यांना जीवदान दिलं.

टाईम्स ऑफ इंडियाच्या आलेल्या वृत्तानुसार, कोरोनाच्या दोन गंभीर रूग्णांना उपचारांसाठी रुग्णवाहिका चालक मनोज आणि आपत्कालीन वैद्यकीय तंत्रज्ञ जय ललिता यांनी स्वत: चा जीव धोक्यात घालत त्यांना रुग्णालयात दाखल केले. या दोघांनी यासाठी मोठे कष्ट केले. संपूर्ण बर्फाळलेल्या रस्त्यातून त्यांनी या दोन रुग्णांना रुग्णालयात दाखल केले.

वाचा-कोरोनापेक्षाही भयंकर आहे Chapre Virus, साध्या तापानं होतोय रुग्णांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, किलाँग भागात दोन कोरोनाच्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती करायचे होते. यासाठी 108 नंबरवरील रुग्णवाहिकेला फोन करून बोलावण्यात आले. परंतु रस्त्यावर साचलेल्या बर्फाच्या चादरीमुळे रुग्णवाहिका पुढे जाणं शक्य नव्हतं. तरीही रुग्णवाहिका चालक मनोज आणि मेडिकल अटेंडंट जय यांनी रस्त्यावरील बर्फ काढत, प्रसंगी गाडी ढकलत प्रवास केला. गरज पडली तेव्हा रुग्णवाहिकेच्या चाकांना स्नो चेनही लावली पण जिद्दीने या गंभीर रुग्णांना रुग्णालयात पोहोचवलंच. मुख्य म्हणजे या दोघांनी हे कष्ट करतानाही कोविड-19 ची सुरक्षितताही राखली त्यांनी पीपीई किट घातलं होतं.

वाचा-COVID-19: 5 हजारांपेक्षा जास्त रुग्णांनी केली कोरोनावर मात

दरम्यान, 108 रूग्ण सेवेचे प्रमुख आशिष शर्मा यांनी रुग्णवाहिका चालक मनोज आणि आपत्कालीन वैद्यकीय तंत्रज्ञ जय या दोघांच्या प्रयत्नांचे कौतुक केलं. त्यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितलं की, "मनोजला हे माहीत होतं की हे काम अत्यंत धोकादायक आहे. जेव्हा कर्मचार्‍यांना रुग्णांच्या स्थितीबद्दल सांगितलं तेव्हा त्यांनी कोणताही प्रश्न न विचारता ते तयार झाले. त्यांनी प्राण पणाला लावून त्यांचं कर्तव्य बजावलं.

Published by: Priyanka Gawde
First published: November 18, 2020, 2:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading