वॉशिंग्टन, 18 नोव्हेंबर : कोरोनाव्हायरसचं (Coronavirus Pandemic) पहिलं प्रकरणं सापडून मंगळवारी एक वर्ष पूर्ण झालं, अद्यापही कोरोनाची भीती लोकांच्या मनात कायम आहे. एक वर्ष झालं तरी जगभरातील सर्व तज्ज्ञ, डॉक्टर कोरोनाची लस शोधत आहे. आता कोरोना सारखाच आणखी एक व्हायरस जगासमोर आला आहे. अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्रानेही याची पुष्टी केली आहे. बोलिव्हियामध्ये या व्हायरसचे संसर्ग होण्याच्या घटना समोर आल्या आहे. हा एक प्रकारचा ताप असून यामुळे मेंदूत रक्तस्राव होऊ शकतो. या व्हायरसची लक्षणं इबोलासारखी आहे.
वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, या व्हायरसचे नाव चॅप्रे व्हायरस(Chapre Virus) आहे. या व्हायरसची प्रकरणं 2004 मध्ये बोलिव्हियाच्या चॅप्रे भागात दिसून आली. लाइव्ह सायन्सच्या अहवालानुसार, सीडीसीने म्हटले आहे की 2019 मध्ये या संसर्गामुळे ग्रस्त पाच पैकी तीन लोक आरोग्य कर्मचारी होते, त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला.
वाचा-Pfizer च्या रूपाने पहिली कोविड लस निर्मितीचं श्रेय या शास्त्रज्ञ जोडप्याला
रिपोर्टनुसार, जॉर्जटाउन विद्यापीठातील संशोधक कॉलिन कार्लसन म्हणाले की, इबोलासारख्या रक्तस्त्रावाचा ताप कोरोना किंवा फ्लूसारखा पसरतो. याचे कारण असे की रक्तस्त्राव तापाची लक्षणे सामान्यत: संसर्गानंतर लगेच दिसून येतात. हा व्हायरस थेट संपर्काद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्क्तीपर्यंत पसरतो.
वाचा-सरकार कोरोना मृत्यूंचे आकडे लपवतंय! रशियन मॉडेलच्या शवागृहातल्या VIDEO मुळे खळबळ
काय आहे या व्हायरसवर उपचार?
2019 मध्ये, चॅप्रे व्हायरसची पहिली चिन्हे मानवी शरीरातील फ्ल्यूड्सच्या कलेक्शनमध्ये आढळली. नमुने गोळा करणारे डॉक्टर मानतात की रूग्ण डेंग्यूच्या संपर्कात आले असावेत. सीडीसीच्या संशोधक मारिया मोरालेस यांनी म्हटले आहे की 'दक्षिण अमेरिकेत डेंग्यूचा प्रादुर्भाव जास्त आहे. हेमोरेजिक फिव्हरची लक्षण ही डेंग्यू सारखीच असतात'. सीडीसीच्या संसर्गजन्य रोग तज्ज्ञ केटलिन कोसाबुम यांनी सांगितले की ज्यांना विषाणूची लागण झाली आहे अशा रुग्णांना ताप, ओटीपोटात वेदना, उलट्या होणे, हिरड्यांमधून रक्त येणे, त्वचेवर फोड आणि डोळ्याच्या दुखण्याची तक्रार आहे. सध्या या व्हायरसवर कोणताही इलाज नाही.