कोरोनाचा महाराष्ट्राला हादरा, 24 तासांत उच्चांकी 7074 नवे रुग्ण, संख्या गेली 2 लाखांवर

कोरोनाचा महाराष्ट्राला हादरा, 24 तासांत उच्चांकी 7074 नवे रुग्ण, संख्या गेली 2 लाखांवर

आज नवे रुग्ण, मृत्यूची संख्या आणि एकूण संख्या या तिनही गोष्टींमध्ये विक्रमी वाढ झाली असून प्रशासन आणि सरकारची डोकेदुखी वाढली आहे.

  • Share this:

मुंबई 4 जुलै: महराष्ट्र आज पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या (Coronavirus Patient ) संख्येने हादरुन गेला आहे. 24 तासांत राज्यात  7074  नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 200064 वर गेली आहे. आज 295 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूची एकूण संख्या 8671वर गेली आहे. तर मुंबईत रुग्णांची एकूण संख्या 83237 वर गेली असून फक्त  मुंबईत आत्तापर्यंत 4830 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज नवे रुग्ण, मृत्यूची संख्या आणि एकूण संख्या या तिनही गोष्टींमध्ये विक्रमी वाढ झाली असून प्रशासन आणि सरकारची डोकेदुखी वाढली आहे.

आज 3395 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. राज्याचा Recovery Rate 54.2 एवढा झाला आहे. अनलॉकची सुरू असलेली प्रक्रिया आणि वाढती गर्दी यामुळे रुग्णसंख्या वाढत असून सरकारची चिंता आणखी वाढली आहे.

पुण्यात लॉकडाउन  हटविल्यानंतर (After pune lockdown) महिन्याभरात Covid-19 रूग्णांची संख्या तिप्पट वाढलीय तसंच मृत्यूसंख्येतही दुप्पट वाढ झाली आहे. Active रूग्णसंख्याही 3 हजारांवरून थेट 6 हजारांच्यावर गेली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाचे स्थानिक नेतेही पुन्हा टोटल लॉकडाऊनची (Total Lockdown) मागणी करू लागले आहेत. सजग नागरिक मंचाने मात्र लॉकडाऊनला कडाडून विरोध दर्शवला आहे. त्यावरून राजकारणालाही (Politics on Covid-19 ) आता सुरूवात झाली आहे.

रुग्णसंख्या वाढल्याने पुण्यात पुन्हा टोटल लॉकडाऊन करण्यावरून राजकारणाला सुरुवात झाली आहे. लॉकडाऊन उठताच पुण्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. लोक सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नसल्यामुळे आजपर्यंत काही भागापूरताच मर्यादित असलेला असलेला कोरोनाचा संसर्ग आता कोथरूड, कोरेगावपार्कसारख्या उच्चभू भागातही आपले हातपाय पसरू लागला आहे. त्यामुळे भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी शहरात पूर्णपणे लॉकडाऊन करा अशी मागणी केली आहे.

देहविक्री करणारी तरुणी कोरोना पॉझिटिव्ह, तब्बल 1 डझन पोलिस कॉन्स्टेबल क्वारंटाईन

भारत बायोटेकने विकसित केलेली कोरोनावरील लस 15 ऑगस्टपर्यंत तयार होऊ शकते, असा दावा आयसीएमआरने केला. त्यामुळे काहीसा दिलासा व्यक्त केला जात असतानाच काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक गंभीर आरोप केला आहे.

पुण्यात कोरोनाचा उद्रेक, महिन्याभरात वाढलेल्या रूग्णांचा आकडा वाचून बसेल धक्का

'कोव्हीड-19 साठी लस 15 ऑगस्ट पर्यंत तयार होईल हा #ICMR चा दावा अवास्तव आहे. लॉकडाऊनचा गोंधळ, कोलमडलेली अर्थव्यवस्था, गलवान खोऱ्यातील नामुष्की या पार्श्वभूमीवर मोदींना लाल किल्ल्यावरून एखादी मोठी घोषणा करता यावी यासाठी हा आटापिटा आहे का?' असा घणाघाती सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. तसंच चव्हाण यांनी याबाबत आरोग्य मंत्र्यांनी स्पष्टीकरण केले पाहिजे, अशी मागणीही केली आहे.

संपादन - अजय कौटिकवार

First published: July 4, 2020, 9:23 PM IST

ताज्या बातम्या