जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Lockdown नंतर पुण्यात कोरोनाचा उद्रेक, महिन्याभरात वाढलेल्या रूग्णांचा आकडा वाचून बसेल धक्का

Lockdown नंतर पुण्यात कोरोनाचा उद्रेक, महिन्याभरात वाढलेल्या रूग्णांचा आकडा वाचून बसेल धक्का

याशिवाय चढ्या दराने फेस शिल्ड आणि मास्कची खरेदी मुंबईत करण्यात आली असून विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनाचं हे कंत्राटं दिल्याचाही भाजपने दावा केला आहे. यावेळी ई टेंडरला बगल दिली गेल्याचे भाजपने आपल्या अविश्वास प्रस्तावात म्हटले आहे.

याशिवाय चढ्या दराने फेस शिल्ड आणि मास्कची खरेदी मुंबईत करण्यात आली असून विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनाचं हे कंत्राटं दिल्याचाही भाजपने दावा केला आहे. यावेळी ई टेंडरला बगल दिली गेल्याचे भाजपने आपल्या अविश्वास प्रस्तावात म्हटले आहे.

लोक सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नसल्यामुळे आजपर्यंत काही भागापूरताच मर्यादित असलेला असलेला कोरोनाचा संसर्ग आता कोथरूड, कोरेगावपार्कसारख्या उच्चभू भागातही आपले हातपाय पसरू लागला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे 4 जुलै: पुण्यात लॉकडाउन  हटविल्यानंतर (After pune lockdown) महिन्याभरात Covid-19 रूग्णांची संख्या तिप्पट वाढलीय तसंच मृत्यूसंख्येतही दुप्पट वाढ झाली आहे. Active रूग्णसंख्याही 3 हजारांवरून थेट 6 हजारांच्यावर गेली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाचे स्थानिक नेतेही पुन्हा टोटल लॉकडाऊनची (Total Lockdown) मागणी करू लागले आहेत. सजग नागरिक मंचाने मात्र लॉकडाऊनला कडाडून विरोध दर्शवला आहे. त्यावरून राजकारणालाही (Politics on Covid-19 ) आता सुरूवात झाली आहे. रुग्णसंख्या वाढल्याने पुण्यात पुन्हा टोटल लॉकडाऊन करण्यावरून राजकारणाला सुरुवात झाली आहे. लॉकडाऊन उठताच पुण्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. लोक सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नसल्यामुळे आजपर्यंत काही भागापूरताच मर्यादित असलेला असलेला कोरोनाचा संसर्ग आता कोथरूड, कोरेगावपार्कसारख्या उच्चभू भागातही आपले हातपाय पसरू लागला आहे. त्यामुळे भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी शहरात पूर्णपणे लॉकडाऊन करा अशी मागणी केली आहे. भाजपच्या या मागणीला राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे आणि काँग्रेस गटनेते आबा बागुल यांनी पाठिंबा दिला आहे. सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी मात्र, पुन्हा लॉकडाऊन करण्यास कडाडून विरोध दर्शवला आहे. लॉकडाऊन हा उपाय होऊ शकत नाही. लोकांनी आणि सरकारने मिळून उपाययोजना केल्या पाहिजेत असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. अक्षयकुमारचा ‘तो’ नाशिक दौरा वादाच्या भोवऱ्यात, भुजबळ यांनी दिले चौकशीचे आदेश दरम्यान, पालिका आयुक्त शेखर गायकवाड आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मात्र पुण्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा तुर्तास तरी कोणताही विचार नसल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाचा वाढता उद्रेक नेमका थांबवणार तरी कसा? असा प्रश्न विचारला जात आहे. तर विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला  आणखी किती दिवस लॉकडाऊन राहणार असा सवाल केला आहे. छगन भुजबळांच्या मतदारसंघात कोरोनाचा विस्फोट, एका दिवसात आढळले एवढे रुग्ण कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून बाहेर पडण्याचा आता सरकारला विचार करावा लागणार आहे. अन्यथा नागरिकांना आणखी मोठ्या आर्थिक समस्येला सामोरे जावं लागणार आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. आता आणखी किती दिवस लॉकडाऊन करण्यात येणार आहे असा सवाल त्यांनी केलाय.  सरकारनं कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी एक कार्यपद्धती ठरवायला हवी, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. संपादन - अजय कौटिकवार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात