BREAKING: महाराष्ट्रातील लॉकडाऊन बाबत आज अंतिम निर्णय, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठक संपली

BREAKING: महाराष्ट्रातील लॉकडाऊन बाबत आज अंतिम निर्णय, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठक संपली

महाराष्ट्रात लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) लागणार की नाही याबाबत आजच महत्त्वाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. याबाबत चर्चा करपण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या (CM Uddhav Thackeray) अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली.

  • Share this:

मुंबई, 21 एप्रिल: महाराष्ट्रात लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) लागणार की नाही याबाबत आजच महत्त्वाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. राज्यातील कोरोनाची आकडेवारी चिंताजनक (Coronavirus in Maharashtra) आहे. याबाबत चर्चा करपण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या (CM Uddhav Thackeray) अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. ही बैठक आता संपली असून लॉकडाऊनबाबत लवकरचत निर्णय जाहीर केला जाऊ शकतो. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये लॉकडाऊनबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला असून काहीच वेळात एसओपी (Standard Operating Procedure) देखील जारी केला जाईल, अशी सूत्रांची माहिती आहे.

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना बाधितांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता संपूर्ण लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. याबाबत आजच अंतिम निर्णय समोर येण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन जाहीर झालाच तर त्यासंदर्भातील गाइडलाइन्सही सरकारकडून जारी केल्या जातील.

(हे वाचा-जगात सर्वात स्वस्त भारताची Covishield कोरोना लस; Serum ने जारी केली किंमत)

दरम्यान लॉकडाऊनबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी देखील महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. राजेश टोपे यांनी असं  म्हटलं आहे की, राज्यात लॉकडाऊन लावण्यात येणार नसून निर्बंध आणखी कठोर (strict restrictions) करण्यात येणार आहेत. राजेश टोपे म्हणाले की, 'काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जरी सांगितलं असेल की, लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणून सांगितला असेल तरी मला असं वाटतं की, राज्यातील परिस्थिती पाहता राज्यातील कोरोनाची साखली तोडायची असेल तर 'ब्रेक द चेन' करुन ही साखळी तोडणार आहोत. संपूर्ण मंत्रिमंडळाने भूमिका मांडली की आपल्याला लॉकडाऊन करुन ही साखळी तोडावी लागेल. त्या अनुषंगाने आता राज्यात लॉकडाऊन हा जरी शब्द नसला तरी 'ब्रेक द चेन' कठोर निर्बंध लागू करण्यात येणार आहेत.'

Published by: Janhavi Bhatkar
First published: April 21, 2021, 3:09 PM IST
Tags:

ताज्या बातम्या