मुंबई, 21 एप्रिल : 1 मेपासून 18+ व्यक्तींचं कोरोना लसीकरण सुरू केलं जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारने लस उत्पादक कंपन्यांना आपली कोरोना लस थेट राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना पुरवण्याची मुभाही दिली. त्यासाठी किंमती जारी (Corona vaccine price) करण्यास सांगण्यात आल्या होत्या. त्यानुसार पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (Serum Institute of India) आपल्या कोरोना लशीची (Corona vaccine) किंमत जारी केली आहे. कोविशिल्ड (Covishield) ही कोरोना लस जगातील सर्वात स्वस्त कोरोना लस आहे. सीरमने दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारला 400 रुपये दराने एक डोस तर खाजगी रुग्णालयांना 600 रुपये दराने विक्री केली जाणार आहे. इतर देशांच्या तुलनेत कोविशिल्ड लस खूपच स्वस्त आहे. अमेरिकेतील कोरोना लशीचा एक डोस 1500, तर रशिया आणि चीनमधील कोरोना लशीचा एक डोस 750 रुपयांना आहे. त्या तुलनेत भारतातील कोरोना लस खूपच कमी आहे.
IMPORTANT ANNOUNCEMENT pic.twitter.com/bTsMs8AKth
— SerumInstituteIndia (@SerumInstIndia) April 21, 2021
1 मेपासून देशातील सर्वात मोठा लसीकरणाचा टप्पा सुरू होता आहे. त्यामुळे लस उत्पादक कंपन्यांना त्यांच्या लसीकरणाचं उत्पादन वाढण्यास सांगण्यात आलं आहे. त्यापैकी 50% पुरवठा हा केंद्र सरकारला केला जाईल आणि उर्वरित 50 टक्क्यांपैकी काही पुरवठा राज्य सरकारला करण्यास सांगण्यात आलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारमार्फत ठरलेल्या निकषांनुसार राज्यांना लस मिळेल. पण लशीचा तुटवडा असेल किंवा अतिरिक्त लस हवी असेल तर राज्य सरकारला आता केंद्राकडे लस मागण्याची गरज नाही. थेट लस उत्पादकांकडून त्यांना लस घेता येईल. याच 50 टक्क्यांपैकी काही पुरवठा बाजारात आणण्याची मुभा लस उत्पादक कंपन्यांना देण्यात आली आहे. लशीची एक किंमत ठरवून ती बाजारात आणावी, असं केंद्राने सांगितलं आहे. हे वाचा - ऑक्सिजन संपल्याने 3 कोरोना रुग्णांचा मृत्यू, 20 गंभीर रुग्णांना अन्यत्र हलवले देशात 16 जानेवारी, 2021 पासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली. त्यानुसारच टप्प्याटप्प्याने लसीकरण केलं जातं आहे. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना कोरोना लस देण्यात आली. केंद्र सरकारने लसीकरणाचा प्राधान्यक्रम ठरवला. त्यानंतर 1 मार्चपासून ज्येष्ठ आणि इतर आजार असलेल्या 45 पेक्षा जास्त वयांच्या नागरिकांचं लसीकरण सुरू करण्यात आलं. 1 एप्रिलपासून 45 पेक्षा जास्त वयाच्या सर्वच नागरिकांना कोरोना लस देणं सुरू झालं. यानंतर 45 पेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना कोरोना लस द्यावी अशी मागणी महाराष्ट्रासह काही राज्यांनी केली. सुरुवातीला केंद्र सरकारने ही मागणी नाकारली होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 18 पेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना कोरोना लस द्यावी, असा निर्णय घेतला आहे. देशातील आरोग्य तज्ज्ञांसह बैठक घेतल्यानंतर मोदींनी हा निर्णय घेतला आहे. हे वाचा - जगात सर्वात भारी मानली जाते कोरोनाची ही लस; काय आहेत तिची वैशिष्ट्यं केंद्र सरकारमार्फत प्राधान्य गटासाठी सुरू असलेली मोफत लसीकरण मोहीम मात्र सुरूच राहिल, असंही केंद्राने स्पष्ट केलं आहे.