मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /बापरे! तरुणीला चुकून एकाच वेळी दिले कोरोना लसीचे सहा डोस, वाचा पुढे नेमकं काय घडलं

बापरे! तरुणीला चुकून एकाच वेळी दिले कोरोना लसीचे सहा डोस, वाचा पुढे नेमकं काय घडलं

कसं शोधाल व्हॅक्सीनेशन सेंटर ?

कसं शोधाल व्हॅक्सीनेशन सेंटर ?

23 वर्षाच्या महिलेला एक-दोन नव्हे तर लसीचे तब्बल सहा डोस देण्यात आले आहेत. यानंतर महिलेला रुग्णालयात डॉक्टरांच्या (Doctor) निरीक्षणात ठेवण्यात आलं.

इटली 11 मे: संपूर्ण जग कोरोना महामारीचा (Corona Pandemic) सामना करत असताना आता याविरोधात लढा देण्यासाठी लस (Corona Vaccine) हा महत्त्वाचा पर्याय मानला जात आहे. अशात लसीकरणामध्येही (Vaccination) मोठा हलगर्जीपण होत असल्याच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. असंच आणखी एक प्रकरण आता समोर आलं आहे. यात 23 वर्षाच्या महिलेला एक-दोन नव्हे तर लसीचे तब्बल सहा डोस देण्यात आले आहेत. यानंतर महिलेला रुग्णालयात डॉक्टरांच्या (Doctor) निरीक्षणात ठेवण्यात आलं. आता महिलेची प्रकृती स्थिर असून तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आरोग्य सेतु, Co-WIN वर वॅक्सिनेशन स्लॉट मिळत नाहीये? हे पर्याय ठरतील मदतशीर

ही घटना इटलीमधील आहे. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, टस्कनीमधील नोआ रुग्णालयात एक महिला रविवार लस घेण्यासाठी गेली, मात्र चुकून तिला एकदाच लसीचे सहा डोस देण्यात आले. रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं, की या महिलेची प्रकृती ठीक असून तिला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. चोवीस तास डॉक्टरांच्या निरीक्षणात ठेवल्यानंतर या महिलेला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

नेमकं घडतंय काय! वर्षभरापासून फ्रिजरमध्ये स्टोर आहेत 750 कोरोना रुग्णांचे मृतदेह

एका आरोग्य कर्मचाऱ्यानं चुकून इंजेक्शनमध्ये व्हायलमधील (बाटली) संपूर्ण लस भरली. एका बाटलीमध्ये सहा डोस असतात. आरोग्य कर्मचाऱ्याला आपली चुकीची भनक लागली तोपर्यंत लस देऊन झाली होती. रुग्णालयानं दिलेल्या माहितीनुसार, आता डॉक्टर या महिलेच्या रोगप्रतिकारशक्तीवर सतत नजर ठेवतील. ही महिलादेखील रुग्णालयात सायकोलॉजी विभागात इंटर्न आहे. याप्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र, हे चुकून झालं असून मुद्दाम केलं गेलं नसल्याचं रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं आहे.

First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine, Corona vaccine in market