मराठी बातम्या /बातम्या /देश /

कोरोनाव्हायरसविरोधात कधी येणार औषध? भारतातील तज्ज्ञांनी दिली मोठी माहिती

कोरोनाव्हायरसविरोधात कधी येणार औषध? भारतातील तज्ज्ञांनी दिली मोठी माहिती

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे क्लॉटिंग डिसऑर्डरसुद्धा होण्याची भीती असते. ज्यामुळे इस्किमिक किंवा हेमरेजिक (रक्तस्राव) स्ट्रोक देखील होतो. या विषाणूंमुळे मेंदू आणि मेनिन्जेसमध्ये थेट संसर्ग होऊ शकतो. या व्यतिरिक्त, रोगप्रतिकारक प्रणालीत जळजळ होऊ शकते, ज्यामुळे मेंदू आणि नसा खराब होऊ शकतात.

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे क्लॉटिंग डिसऑर्डरसुद्धा होण्याची भीती असते. ज्यामुळे इस्किमिक किंवा हेमरेजिक (रक्तस्राव) स्ट्रोक देखील होतो. या विषाणूंमुळे मेंदू आणि मेनिन्जेसमध्ये थेट संसर्ग होऊ शकतो. या व्यतिरिक्त, रोगप्रतिकारक प्रणालीत जळजळ होऊ शकते, ज्यामुळे मेंदू आणि नसा खराब होऊ शकतात.

Coronavirus विरोधात लस किंवा औषध कधी येणार याची प्रतीक्षा प्रत्येकालाच आहे.

    नवी दिल्ली, 23 मे : जगभरात कोरोनाव्हायरसचे 53 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. 3 लाखांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाव्हायरसविरोधात लस किंवा औषध कधी येणार याची प्रतीक्षा प्रत्येकालाच आहे. कोरोनाव्हायरसविरोधातील अनेक लसींच्या चाचणी तर सुरूच आहेत. मात्र त्याविरोधात प्रभावी औषध कधी येणार याची प्रतीक्षाही आहे. याबाबत भारतातील तज्ज्ञांनी मोठी माहिती दिली आहे. कोरोनाव्हायरसविरोधात नवं औषधं विकसित होण्यासाठी किमान 5 ते 10 वर्षे तरी लागू शकतात, असं सीएसआयआरचे (Council of Scientific & Industrial Research - CSIR) राम विश्वकर्मा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. राम विश्वकर्मा म्हणाले, "सध्या तरी कोरोनाव्हायरसविरोधात नवीन औषध तयार करण्याइतपत पुरेसा वेळ आपल्याकडे नाही. नवीन औषध विकसित करण्यासाठी 5 ते 10 वर्षे लागू शकतात. त्यामुळे आपण सध्या जी औषधं उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करत आहोत. या औषधांचं क्लिनिकल ट्रायल घेऊन ही औषधं प्रभावी आहेत की नाहीत हे तपासत आहोत" 130 औषधांचं ट्रायल अमेरिकेतील थिंक टँक मिल्कन इन्स्टिट्युटच्या ट्रॅकरनुसार कोरोनाव्हायसवर उपचारासाठी 130 पेक्षा जास्त औषधांचं परीक्षण सुरू आहे. काही औषधांमध्ये व्हायरसला रोखण्याची क्षमता असू शकते. तर काही औषधं रोगप्रतिकारक शक्ती अतिसक्रिय होण्यापासून रोखू शकतात. हे वाचा - कोरोनामुळे रखडली लसीकरण मोहीम; लस न मिळाल्याने तब्बल 8 कोटी मुलांचा जीव धोक्यात विश्वकर्मा यांनी सांगितलं, "कोरोनाव्हायरसविरोधात सध्या एक प्रभावी मार्ग आहे तो म्हणजे इतर आजारांवर उपचारासाठी मान्यता देण्यात आलेल्या औषधांचा कोरोनाव्हायरसवरील उपचारांसाठी प्रयोग. याचं एक उदाहरण म्हणजे रेमिडेसिवीर. या औषधामुळे लोकं लवकर बरे होण्यास मदत होत आहे. या औषधामुळे गंभीर रुग्णांचा मृत्यू होण्याचं प्रमाणही कमी झालं आहे. हे औषध जीवनरक्षक ठरू शकतं. फेविपिरावीर औषधदेखील आशादायक आहे" "एचआयव्ही आणि व्हायरल इन्फेक्शनवर उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या काही औषधांचा कोरोनाव्हायरसविरोधात वापर करून पाहता येऊ शकतो आणि जर ही औषधं प्रभावी ठरली तर औषध नियामक संस्थांची मान्यता घेऊन ही औषधं कोरोनाव्हायरसविरोधात उपचार म्हणून वापरता येऊ शकतात", असं विश्वकर्मा म्हणाले. हे वाचा - जूनमध्ये होणार कोरोनाचा उद्रेक; टीबी तपासणीच्या मशीनने होणार कोरोना टेस्ट
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona vaccine

    पुढील बातम्या