मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Black Fungus चं औषध टॅक्स फ्री; कोरोना लशीवरील GST कायम; अर्थमंत्र्यांची घोषणा

Black Fungus चं औषध टॅक्स फ्री; कोरोना लशीवरील GST कायम; अर्थमंत्र्यांची घोषणा

ब्लॅक फंगसच्या औषधावर कर आणि कोरोना लशीवरील जीएसटी यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला आहे की कोरोना लशीवरील जीएसटीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही

ब्लॅक फंगसच्या औषधावर कर आणि कोरोना लशीवरील जीएसटी यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला आहे की कोरोना लशीवरील जीएसटीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही

ब्लॅक फंगसच्या औषधावर कर आणि कोरोना लशीवरील जीएसटी यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला आहे की कोरोना लशीवरील जीएसटीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही

नवी दिल्ली, 12 जून: ब्लॅक फंगसच्या औषधावर कर आणि कोरोना लशीवरील जीएसटी यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला आहे की कोरोना लशीवरील जीएसटीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेमुळे (Second Wave of COVID-19) देशात हाहाकार माजला आहे. या लाटेचा परिणाम सध्या कमी होत असला तरी झालेले नुकसान मोठे आहे.

आर्थिक नुकसानाबरोबरच इतर काही आजारांनी देखील यावेळी डोकं वर काढलं आहे. कोरोनासोबतच ब्लॅंक फंगस (Black Fungus), व्हाईट फंगस (White Fungus) या संसर्गजन्य आजाराचा धोका अद्याप कायम आहे. सध्या ब्लॅक फंगसवरील उपचाराकरिता वापरली जाणारी औषधी ही खूपच महाग आहेत. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि कडक निर्बंधांचा परिणाम रोजगार, नोकऱ्यांवर झाला आहे. त्यामुळे अनेकांना आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यातच अशा आजारांचा संसर्ग झाला तर त्यासाठी खर्च करताना अनेक रुग्णांच्या नातेवाईकांची अर्थिकदृष्ट्या परवड होत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनासह, ब्लॅक फंगसवरील उपचारासाठी आवश्यक घटकांच्या किंमती आटोक्यात आणाव्यात अशी मागणी होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या जीएसटी काउन्सिलच्या (GST Council Meeting) बैठकीमध्ये याबाबत चर्चा झाली.

हे वाचा-राज्यात कोरोना आटोक्यात, पण...'या' सहा जिल्ह्यांमध्ये परिस्थिती भयानक

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Central Finance Minister Nirmala Sitharaman) यांच्या अध्यक्षतेखाली आज जीएसटी काउन्सिलची 44 वी महत्वाची बैठक पार पडली. कोरोना काळात ही बैठक महत्त्वाची ठरली कारण यामध्ये काही महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब झाले. कोरोना लशीवरील जीएसटीमध्ये कोणताही बदल न करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. सध्या देशात बनणाऱ्या व्हॅक्सिनवर 5 टक्के जीएसटी आकारला जातो.

बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अर्थमंत्र्यांनी अशी माहिती दिली की, जीएसटी काउन्सिलमध्ये ब्लॅक फंगसचे औषध करमुक्त (Tax Free) करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय जीएसटी काउन्सिलने रेमडेसिव्हिर ओषधावर जीएसटी 12 टक्क्यांवरुन 5 टक्के करण्याचा प्रस्ताव मंजुर करण्यात आला आहे. ऑक्सीमीटर, मेडिकल ग्रेडचा ऑक्सीजन आणि व्हेंटिलेटरवरील जीएसटी देखील 12 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

हे वाचा-खूशखबर! ही बँक त्यांच्या ग्राहकांना देत आहे मोफत रेशन, वाचा कुणाला मिळतोय लाभ?

75 टक्के व्हॅक्सिन मोफत उपलब्ध केली जाईल

सीतारामन यांनी असे म्हटले की, केंद्र सरकार 75 टक्के व्हॅक्सिन खरेदी करत आहे आणि त्यावर जीएसटी देखील भरत आहे. लोकांना सरकारी दवाखान्यात जे हे 75 टक्के व्हॅक्सिन मोफत उपलब्ध केले जात आहे त्याचा जनतेवर काही परिणाम होणार नाही, असा दिलासाही सीतारामन यांनी दिला आहे.

सीतारामन यांनी अशी माहिती दिली की, इलेक्ट्रिक फर्नेसेज आणि टेंपरेचर चेकिंग इक्विपमेंटवरील जीएसटीमध्ये देखील कपात करुन 5 टक्के तर रुग्णवाहिकांवरील जीएसटी 12 टक्के करण्यात आला आहे. हे नवे दर सप्टेंबरपर्यंत वैध असतील. मंत्र्यांच्या गटाने (GOM) ऑगस्टपर्यंत कपात करण्याची मागणी केली होती.

First published:

Tags: Corona, Corona vaccination, Corona vaccine, Corona vaccine cost, Corona vaccine in market, Coronavirus, GST, Nirmala Sitharaman