नवी दिल्ली, 27 मे : कोरोना लसीकरण (Corona vaccination) सुरू झाल्यापासून गोंधळाची परिस्थितीही उद्भवते आहे. कोरोना लशीचे दोन डोस घेणं (Different corona vaccine dose) बंधनकारक आहे. सध्या भारतात दोन कोरोना लशी (Corona vaccine) दिल्या जात आहे. पण एका व्यक्तीने एकाच लशीचे दोन डोस घ्यावे असा सल्ला दिला जातो आहे. दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये एका व्यक्तीला कोरोना लशीचे वेगवेगळे डोस देण्यात आल्याने खळबळ उडाली. दरम्यान यानंतर केंद्र सरकारने पहिल्यांदाच मोठी माहिती दिली आहे. कोरोनाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी कोरोना लसीकरणाबाबतही माहिती देण्यात आली. एकाच व्यक्तीला वेगवेगळी कोरोना लस देण्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. त्यावेळी निती आयोगाचे सदस्य (Niti Aayog) डॉ. व्ही. के. पॉल (Dr VK Paul ) यांनी या शंकेचं निरसन केलं आहे.
As per the protocol, stick to the same dose of vaccine as the first one. If in case people are getting different doses there is no cause for concern, it's safe. We are thinking to mix and match (vaccine doses) on a trial basis: Dr VK Paul Member-Health, Niti Aayog pic.twitter.com/JFnF2BFVDe
— ANI (@ANI) May 27, 2021
डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितलं की, प्रोटोकॉलनुसार एकाच लशीचे दोन डोस द्यायला हवेत. जर क्वचित एखाद्या प्रकरणी एकाच व्यक्तीला दोन वेगवेगळ्या कोरोना लशीचे डोस दिले गेल तरी तसं चिंतेचं कारण नाही. ते सुरक्षित आहे. आपण मिक्स अँड मॅच कोरोना लशीच्या ट्रायलबाबतही विचार करत आहोत. हे वाचा - कोरोना लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारचा नवा निर्णय, वाचा सविस्तर उत्तर प्रदेशमध्ये आरोग्यमंत्री जय प्रतापसिंह यांच्या सिद्धार्थनगर जिल्ह्यातच एकाच गावातील तब्बल 20 लोकांना दोन वेगवेगळ्या लसींचे डोस देण्यात आले. सर्वांची तब्येत सध्या ठीक आहे. मात्र घडल्या प्रकारावरून CMO कडून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान येथील मुख्य डॉक्टर पियुष राय यांनी सांगितलं की, अशा प्रकारची घटना होणं दुर्दैवी आहे. सध्या यापैकी कुणालाही त्रास होत नसला तरी अशा प्रकारे वेगवेगळे दोन डोस घेतल्यास थोडासा ताप येणं, शरीरावर चट्टे उठणे, भीती वाटणे असे काही त्रास यामुळे होऊ शकतात. हे वाचा - एकाच व्यक्तीने वेगवेगळी कोरोना लस घेणं किती सुरक्षित? केंद्राने दिली मोठी माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑक्सफर्ड-अॅस्ट्रझेन्का (Oxford-AstraZeneca) आणि फायजर-बायोएनटेक (Pfizer-BioNTech) या लशींचे मिक्स अँड मॅच (दोन्ही मिळवून एक लस बनवणे) बनवण्याचं काम सुरू आहे. भारतातील एका आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सरकार कोरोना व्हायरलच्या पहिल्या आणि दुसऱ्या लशीमध्ये मिक्स अँड मॅचचा (Mix and match vaccine) विचार करत आहे. News18 शी बोलताना तज्ज्ञांनी सांगितलं की, शास्त्रीय पद्धतीनं हे शक्य आहे आणि भारतात ते फायदेशीरही ठरेल. भारत आणि विदेशात याबाबत सुरू असलेल्या संशोधनावर तज्ज्ञ लक्ष ठेवून आहेत.