मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /या वयोगटातील लोकांना डेल्टा व्हेरियंटचा सर्वाधिक धोका; लसीच्या प्रभावाबाबत WHO चा मोठा खुलासा

या वयोगटातील लोकांना डेल्टा व्हेरियंटचा सर्वाधिक धोका; लसीच्या प्रभावाबाबत WHO चा मोठा खुलासा

Coronavirus: बंगळुरूतील एकाच शाळेतील 60 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग (प्रातिनिधिक फोटो)

Coronavirus: बंगळुरूतील एकाच शाळेतील 60 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग (प्रातिनिधिक फोटो)

डेल्टा प्लस व्हेरियंट अतिशय वेगानं आणि सहजपणे फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो. तर इंग्लंडमधील अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोना विषाणूच्या सर्व प्रकारात डेल्टा व्हेरियंट मुख्य आहे.

नवी दिल्ली 06 जुलै: सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे (Corona Third Wave) संकेत दिले जात असून, सातत्यानं आपल्या रचनेत बदल घडवणाऱ्या कोरोना विषाणूचे डेल्टा (Delta) आणि डेल्टा प्लस (Delta Plus) हे नवे व्हेरियंट धोकादायक ठरण्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. या नव्या व्हेरियंट्सवर सध्या देण्यात येत असलेली लस गुणकारी ठरेल का, असे प्रश्न उभे राहत आहेत, मात्र सध्या दिली जाणारी लस डेल्टा प्लसचा संसर्ग रोखण्यास प्रभावी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं (World Health Organization) म्हटलं आहे, ही दिलासादायक बाब आहे. दैनिक भास्करनं याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.

डेल्टा प्लस व्हेरियंट अधिक प्राणघातक असून, त्याच्या प्रसाराचा वेग अधिक असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. डेल्टा व्हेरियंटमधील म्युटेशन (Mutation) अर्थात उत्परिवर्तनास ‘के 417 एन’ असं नाव देण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या बीटा आणि गामा रूपांमध्येदेखील हे म्युटेशन आढळलं आहे.

Good News! लवकरच Sputnik V लसही मोफत मिळणार; वाचा सरकारचा प्लॅन

नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑफ इम्यूनायझेशनचे (एनटीएटीआय) अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांच्या मते, डेल्टा प्लस व्हेरियंट अतिशय वेगानं आणि सहजपणे फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो. तर इंग्लंडमधील अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोना विषाणूच्या सर्व प्रकारात डेल्टा व्हेरियंट मुख्य आहे. डेल्टामुळे इंग्लंडमध्ये 117 लोकांचा बळी गेला असून त्यातील बहुतेक लोक 50 वर्षांपेक्षा अधिक वयाचे होते. यामध्ये 38 लोकांनी लस घेतलेली नव्हती, तर 50 लोकांना दोन्ही डोस मिळाले होते. तर 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे 6 लोक होते, ज्यांना लस दिली गेली नव्हती आणि दोघांना लसीचा एक डोस मिळाला होता. यावरून 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक, तरुण, लस न घेतलेले तसंच लसीचा एकच डोस मिळालेले लोक अशांना या डेल्टा व्हेरियंटच्या संक्रमणाचा सर्वाधिक धोका असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

यावर लसीकरण हाच एक प्रभावी मार्ग असून, लवकरात लवकर लसीकरण (Vaccination) करणं महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे दोन मास्कचा वापर, सामाजिक अंतर आणि स्वच्छता हे सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळणं आवशयक असल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे.

Alert! ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मोठं संकट; SBI चा धक्कादायक रिपोर्ट

सध्या दिली जाणारी लस डेल्टा प्लसचा संसर्ग रोखण्यास प्रभावी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. भारतात दिली जाणारी लसही डेल्टा प्लस विषाणूपासून बचाव करण्यासाठी प्रभावी असल्याचा अहवाल इंग्लंडच्या पब्लिक हेल्थनं दिला आहे. जगभरातील डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग झालेले 160 रुग्ण आढळले. त्यांच्या जीनोम सीक्वेन्सिंग करण्यात आले होते, त्यात 8 भारतातील होते. डेल्टा व्हेरियंटविरूद्ध लसीचा पहिला डोस घेतला असेल तर 80 टक्के फायदा होतो, तर दुसऱ्या डोसनंतर लस 96 टक्के प्रभावी ठरते. लसीकरणामुळे गंभीर संसर्ग टाळता येणं शक्य होतं. कोरोनाचा विषाणू स्वतःत बदल घडवत असला तरी, संसर्ग टाळण्यासाठी लस हाच एकमेव प्रभावी उपाय आहे, यावर शास्त्रज्ञांनी शिक्कामोर्तब केलं आहे.

First published:

Tags: Corona, Corona updates, Corona vaccination, Corona vaccine, Covid-19, Vaccinated for covid 19