मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /भयावह! स्मशानभूमीत जागा मिळेना; 15 मृतदेहांवर पार्किंगमध्येच अंत्यसंस्कार

भयावह! स्मशानभूमीत जागा मिळेना; 15 मृतदेहांवर पार्किंगमध्येच अंत्यसंस्कार

कोरोना रुग्णांच्या मृतदेहांवर पार्किंगमधील जमीनीवर अंत्यसंस्कार (Dead Corona Patients Funeral) करण्याची वेळ येत असल्याची भयंकर स्थिती समोर येत आहे.

कोरोना रुग्णांच्या मृतदेहांवर पार्किंगमधील जमीनीवर अंत्यसंस्कार (Dead Corona Patients Funeral) करण्याची वेळ येत असल्याची भयंकर स्थिती समोर येत आहे.

कोरोना रुग्णांच्या मृतदेहांवर पार्किंगमधील जमीनीवर अंत्यसंस्कार (Dead Corona Patients Funeral) करण्याची वेळ येत असल्याची भयंकर स्थिती समोर येत आहे.

नवी दिल्ली 18 एप्रिल : देशभरात कोरोनाचा प्रसार (Corona Spread) वाढत असतानाच मृतांच्या प्रमाणातही (Corona Deaths) वाढ झाली आहे. एकीकडे रुग्णांना उपचारासाठी जागा मिळत नसल्याचं चित्र आहे तर दुसरीकडे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीतही जागा मिळत नसल्याची भयंकर स्थिती आहे. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांच्या मृतदेहांवर पार्किंगमधील जमीनीवर अंत्यसंस्कार (Dead Corona Patients Funeral) करण्याची वेळ येत असल्याची भयंकर स्थिती समोर येत आहे. हे चित्र पाहायला मिळत आहे दिल्लीतील सीमापुरी स्मशानभूमीत. पार्किंगमध्येच आतापर्यंत पंधरा जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

कोरोनानं जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत केलं आहे. इतकंच नाही तर सतत मृतदेह जळत असल्यानं स्मशानभूमीमधील फरशी आणि प्लेटदेखील खराब झाल्याचं भयंकर चित्र पाहायला मिळत आहे. 24 तास मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. पूर्व दिल्लीतील पाच कोविज स्मशानभूमीपैकी सीमापुरी स्मशानात परिस्थिती सर्वात वाईट आहे. कोविडसाठीचे 12 प्लॅटफॉर्मही कमी पडत असल्याचं चित्र आहे. याच कारणामुळे स्मशानभूमीजवळ असणाऱ्या दिल्ली महानगरपालिकेच्या पार्किंगच्या जागेवर लोकांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत.

COVID-19 : चाचणी ते उपचार; लक्षणांसोबत कोरोनाबाबत तुम्हाला हे माहीत असायला हवं

यासंदर्भात ज्योत सिंह म्हणतात, की पार्किंगच्या आधी याठिकाणी लहान मुलांवर अंत्यसंस्कार करण्यात येत होते. सुमारे पाच वर्षांपूर्वी येथे मुलांवर अंत्यसंस्कार करणं बंद करण्यात आलं होता. या जागेवर महामंडळचं पार्किंग करायचं होतं, मात्र परिस्थिती लक्षात घेता याजागी आता पुन्हा अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. शनिवारी येथे एकूण 43 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून, जीटीबी हॉस्पिटलचे 36 मृतदेह, मोहन नगर येथील नरेंद्र मोहन रुग्णालयातील एक, गुप्ता नर्सिंग होममधील एक, लोणी रोड येथील एका मृतदेहाचा समावेश आहे.

First published:
top videos

    Tags: Corona updates, Funeral, Patient death