मुंबई, 1 जानेवरी : इस्रायलमध्ये संसर्गाचा एक नवीन प्रकार दिसून आला आहे. याचे वर्णन कोरोनाव्हायरस (Coronavirus) आणि इन्फ्लूएंझा (Influenza) यांचे मिश्र स्वरूप म्हणून केले जात आहे. हा फ्लोरोना (Florona) नावाचा दुहेरी संसर्ग प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या गर्भवती महिलेमध्ये आढळल्याचे स्थानिक वृत्तापत्रात सांगण्यात आलं आहे. आधीच जगभरात ओमिक्रॉनमुळे भीतीचे वातावरणात या नवीन आजाराच्या आगमनामुळे अनेक शंका निर्माण होऊ लागल्या आहेत. हा फ्लोरोना आजार काय आहे? आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, हा फ्लोरोना काही नवीन आजार किंवा नवीन प्रकार नाही. उलट त्याला दुहेरी संसर्ग म्हटले जात आहे. यामध्ये, रुग्णाला कोविड-19 विषाणूसह दोन्ही इन्फ्लूएंझा व्हायरसचा संसर्ग होतो, ज्यामुळे तो कोविड-19 पेक्षा दुप्पट धोकादायक बनू शकतो. मार्च 2020 मध्ये जगात कोविड-19 महामारी सुरू झाल्यानंतर प्रथमच असा संसर्ग दिसून आला आहे. कोरोनाबाबतची ती प्रार्थना आली फळाला; सामूहिक मुंडण करत नागरिकांचा जल्लोष, VIDEO संभाव्यता काय आहे? इन्फ्लूएंझा विषाणू संसर्गात न्यूमोनिया, मायोकार्डिटिस सारखी अनेक गंभीर लक्षणे आहेत, ज्यामुळे कधीकधी रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. कोविड-19 च्या संसर्गासोबत या नवीन संसर्गाने आणखी भितीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता निर्माण होत आहे. इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने आणि रोग नियंत्रण केंद्राने इशारा दिला आहे की, हा संसर्ग झपाट्याने पसरू शकतो किंवा पसरत आहे. गेल्या एक आठवड्यापासून 1800 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. Co-WIN वर लहान मुलांच्या लसीकरणाची नोंदणी Live, अशी आहे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया काय आहेत लक्षणे? या संस्थांनी फ्लोरोनाच्या लक्षणांची माहितीही दिली आहे. डेटा दर्शवितो की या दुहेरी संसर्गात अनेक गंभीर लक्षणे दिसू शकतात. या लक्षणांमुळे न्यूमोनियासह इतर श्वसनाच्या गुंतागुंतीसह मायोकार्डिटिस देखील होऊ शकतो. त्यामुळे योग्य आरोग्य सेवा न मिळाल्यास रुग्णाच्या मृत्यूचा धोका खूप वाढतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.