मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

'...तर कोविड-26 आणि कोविड-32 साठी तयार राहायला हवं', अमेरिकेच्या तज्ज्ञांचा इशारा

'...तर कोविड-26 आणि कोविड-32 साठी तयार राहायला हवं', अमेरिकेच्या तज्ज्ञांचा इशारा

जगातल्या अनेक देशांमध्ये कोरोनाचा (Corona) कहर झाला आहे. या स्थितीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची उत्पत्ती (Origin) नेमकी कुठे आणि कशी झाली याचा शोध सुरूच आहे.

जगातल्या अनेक देशांमध्ये कोरोनाचा (Corona) कहर झाला आहे. या स्थितीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची उत्पत्ती (Origin) नेमकी कुठे आणि कशी झाली याचा शोध सुरूच आहे.

जगातल्या अनेक देशांमध्ये कोरोनाचा (Corona) कहर झाला आहे. या स्थितीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची उत्पत्ती (Origin) नेमकी कुठे आणि कशी झाली याचा शोध सुरूच आहे.

नवी दिल्ली, 31 मे: जगातल्या अनेक देशांमध्ये कोरोनाचा (Corona) कहर झाला आहे. अनेक देश कोरोनाच्या प्रसारामुळे त्रस्त झाले आहेत. सातत्यानं वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे लॉकडाऊन, कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. याचा प्रतिकूल परिणाम सामाजिक, आर्थिक तसेच अन्य बाबींवर झाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थाही कोलमडून गेली आहे. या स्थितीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची उत्पत्ती (Origin) नेमकी कुठे आणि कशी झाली याचा शोध सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर, या विषाणूच्या उत्पत्तीच्या अनुषंगानं अमेरिकेतील दोन तज्ज्ञांनी मोठा इशारा दिला आहे. कोविड-19ची (Covid-19) ची उत्पत्ती कुठे झाली याचा शोध लावणं गरजेचं आहे. अन्यथा कोविड-26 (Covid-26), कोविड-32 (Covid-32) यांना तोंड देण्यासाठी तयार राहावं लागेल, असं अमेरिकी तज्ज्ञांनी म्हटलं आहे. हा इशारा अमेरिकेच्या (America) तत्कालीन डोनाल्ड ट्रम्प सरकारमधील अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त स्कॉट गॉटलीब आणि टेक्सास येथील चिल्ड्रन हॉस्पिटल फॉर व्हॅक्सिन डेव्हलपमेंटचे सहसंचालक पीटर होट्स यांनी दिला आहे, असं वृत्त ब्लूमबर्ग या अमेरिकी माध्यमाने दिलं आहे. यापैकी गॉटलीब हे सध्या फायझर या औषध कंपनीच्या मंडळाचे सदस्यही आहेत. हेही वाचा- नुकतीच झाली होती कोरोनामुक्त, घरी जात असताना अपहरण करुन केला बलात्कार दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, वुहान (Wuhan) येथून कोरोना विषाणूचा प्रसार लीक झाला असल्याची बाब चीन (China)नाकारत असला, तरी याबाबतचे पुरावे अधिक सबळ होताना दिसत आहेत. दरम्यान, अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माइक पोम्पियो यांनी चिनी लष्कराच्या हालचालींमध्ये वुहान येथील प्रयोगशाळा (Lab) सहभागी असल्याचा दावा केला आहे. त्यांनी सांगितल की, या लॅबमध्ये नागरी संशोधनाच्या नावाखाली चिनी लष्कराशी संबंधित कृती, हालचाली केल्या जात आहेत. याबाबत चीनने जागतिक आरोग्य संघटनेलाही (WHO) माहिती देण्यास नकार दिला आहे. हेही वाचा- अमेरिकेत भारतीय वंशाचा रेल्वेचालक ठरला हिरो; 'असा' वाचवला एकाचा जीव दरम्यान, स्कॉट गॉटलीब, पीटर होट्स यांनी सांगितलं, की कोविड -19च्या उत्पत्ती बाबत आणि भविष्यातील महामारीचा (Pandemic) उद्रेक रोखण्यासाठी चीन सरकारने जगाला साह्य केलं पाहिजे. गॉटलीब यांनी सांगितलं, की चीनमधील वुहान लॅबमधून कोरोना विषाणूची उत्पत्ती झाली असल्याच्या थेअरीबाबत अधिक सबळ पुरावे मिळाले आहेत. मात्र ही थिअरी चुकीची असल्याचं सिद्ध करण्यासाठी चीनने अद्याप सबळ पुरावे दिलेले नाहीत. पीटर होट्स यांनी सांगितलं की, कोरोना ज्या प्रकारे पसरला, त्यामुळे भविष्यात साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे. मात्र ही बाब अजूनही जगाच्या लक्षात येत नाही आहे.
First published:

Tags: Case in india, Coronavirus, Covid-19

पुढील बातम्या