मराठी बातम्या /बातम्या /aurangabad /फेसबुकवर पोस्ट करुन औरंगाबादमध्ये एसटी बससमोर येऊन तरुणाची आत्महत्या, आत्महत्येपूर्वी मोबाईल केला होता बंद

फेसबुकवर पोस्ट करुन औरंगाबादमध्ये एसटी बससमोर येऊन तरुणाची आत्महत्या, आत्महत्येपूर्वी मोबाईल केला होता बंद

पैठण (Paithan) तालुक्यातल्या अमरापूर वाघूडी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.  वैयक्तिक आयुष्याला कंटाळलेल्या एका तरुणानं फेसबूकवर (Facebook Post) पोस्ट करत आत्महत्या केली आहे.

पैठण (Paithan) तालुक्यातल्या अमरापूर वाघूडी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. वैयक्तिक आयुष्याला कंटाळलेल्या एका तरुणानं फेसबूकवर (Facebook Post) पोस्ट करत आत्महत्या केली आहे.

पैठण (Paithan) तालुक्यातल्या अमरापूर वाघूडी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. वैयक्तिक आयुष्याला कंटाळलेल्या एका तरुणानं फेसबूकवर (Facebook Post) पोस्ट करत आत्महत्या केली आहे.

औरंगाबाद, 19 ऑगस्ट: वैयक्तिक आयुष्याला कंटाळलेल्या एका तरुणानं फेसबूकवर (Facebook Post) पोस्ट करत आत्महत्या केली आहे. पैठण (Paithan) तालुक्यातल्या अमरापूर वाघूडी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. अखिल भारतीय छावा युवक संघटनेच्या पैठण तालुका युवक अध्यक्षानं एसटी बस (ST Bus) समोर येऊन उडी मारुन आत्महत्या (Suicide) केली आहे. महेश शिंदे पाटील असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. मंगळवारी रात्री नेवासा- नगर महामार्गावरील कांगोणी फाट्याजवळ त्यानं आपली जीवनयात्रा संपवली आहे.

महेश गेल्या अनेक दिवसांपासून तणावात होता. अखिल भारतीय छावा संघटनेच्या माध्यमातून तालुका युवक अध्यक्षपदावर महेश काम करत होता.

फेसबूकवर पोस्ट टाकून महेश आत्महत्या करत असल्याची माहिती दिली. माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरू नका अशी फेसबुकवर पोस्ट केली. पोस्ट टाकल्यानंतर त्याचे मित्र, जवळील नातेवाईक अशा अनेकांनी त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानं आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईल बंद करुन ठेवला होता. त्याच्या पोस्टवर बऱ्याच जणांनी कमेंट करुन असं टोकाचं पाऊल उचलू नकोस, अशी विनवणी केली. मात्र तोवर महेशनं धक्कादायक पाऊल उचललं होतं.

तालिबानचा भारताला मोठा धक्का, घेतला हा मोठा निर्णय 

महेशची FB पोस्ट

आयुष्य खूप छान आहे पण त्याचे जवळचे लोक sobat असतिल तर माझही आयुष्य खूप सुंदर होत ..पण मला कदाचित जगता आलं नाही मी माझ्या चुकीमुळे जगलो नाही...मला जगता आल नाही...khup प्रेमाचे लोक भेटले..माझे मित्र तर एवढे ना की.कोणाचा जीव घेतील मी म्हणलो तर...पण असो...माझ्या आयुष्यात..खूप त्रास आहे...जो मी konala sangu shakat nhi......pn mazi ek echha ahe mazya मृत्यु ला कोणालाही जबाबदार ठरवू नये... मी मझ्या त्रासामुळे मरतोय... माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या मझ्या जिवलागांना खूप खूप धन्यवाद... thank u so much all

First published:

Tags: Aurangabad News, Suicide case, Suicide news