Home /News /coronavirus-latest-news /

कोरोनामुळे मरणाच्या दारात पोहोचलेल्या व्यक्तीचं आपल्या पत्नीला भावुक पत्र, म्हणाला...

कोरोनामुळे मरणाच्या दारात पोहोचलेल्या व्यक्तीचं आपल्या पत्नीला भावुक पत्र, म्हणाला...

हे पत्र संबंधित व्यक्तीच्या भावानं एका प्रसिद्ध कार्यक्रमात शेअर केलं असून त्यावेळी भावानी सांगितलं की, त्याक्षणी मला आणि त्याला समजलं होतं की, हे त्याचं शेवटचं पत्र आहे.

    टेक्सास, 06 जानेवारी: 2020 सालात सर्व जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूनं (Coronavirus) अनेक लोकांची जीवाभावाची माणसं हिरावून घेतली आहेत. कोणाच्या मायेचं छत्र हरवलं तर कित्येक जीवांना अनाथ केलं आहे. या साथीनं मानवाला अनेक धडे दिले आहेत. आपल्या लोकांना जपण्यासाठी लागणारं धैर्यही कोरोना विषाणूनं दिलं आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये कोरोना झाल्यानंतर मृत्यूच्या दारात असलेल्या पतीनं त्याच्या पत्नीसाठी एक भावनिक पत्र लिहीलं आहे. कोरोना विषाणूमुळे आपला जीव गमावलेल्या पतीनं आपल्या पत्नीला शेवटचं पत्र लिहिलं आहे. टेक्सासमधील मॅक्लीन मेडिकल सेंटरमध्ये 13 डिसेंबर रोजी 45 वर्षीय व्यक्ती बिली लोरेडो (Billy Loredo) यांचं निधन झालं. मृत्यूच्या काही वेळापूर्वी बिलीनं आपली पत्नी सोन्या कायपुरोसला (Sonya Kypuros) एक पत्र ईमेल केलं आहे. बिलीनं या पत्रात लिहिलं की, मरण्यापूर्वी मला माझ्या हृदयातल्या काही गोष्टी तुला सांगायच्या आहेत. मी तुला सांगू इच्छितो की, मी तुझ्याबरोबर घालवलेलं आयुष्य म्हणजे एक अद्भुत प्रवास होता आणि जगातील कोणत्याही मौल्यवान वस्तूशी याची तुलना होऊ शकत नाही. (हे वाचा-Google मध्येही तयार झाली आहे कामगार संघटना, कंपनीतील शोषणाविरुद्ध लढणार) तू नेहमी आनंदी राहा आणि कोणत्याही प्रकारची खंत न बाळगता तू तुझं जीवन व्यतीत करावं, अशी माझी इच्छा आहे. आपण एकत्र घालवलेला वेळ खरंच विस्मरणीय होता. बिलीचा मोठा भाऊ पेड्रो लोरेडो यांनी सांगितलं की, बिलीनं हे पत्र ऑक्सिजन नळी लावण्यापूर्वी आपल्या पत्नी सोन्याला पाठवलं होतं. 'गुड मॉर्निंग अमेरिका' या प्रसिद्ध कार्यक्रमात हे पत्र वाचून दाखवलं बिलीचं हे पत्र त्याच्या भावाने अमेरिकेच्या 'गुड मॉर्निंग अमेरिका' या प्रसिद्ध कार्यक्रमात शेअर केलं होतं. त्यावेळी भावानं म्हटलं की, त्याक्षणी मला आणि त्याला समजलं होतं की, हे त्याचं शेवटचं पत्र आहे. पत्नि सोन्याला माझ्या भावाचं हे शेवटचं पत्र मिळाल्यानंतर तिचं हृदय पिळवटून गेलं. त्याच्या भावाने असं सांगितलं की, बिली हा एक रोमँटिक व्यक्ती होता. त्यानं अनेकदा आपल्या पत्नीला प्रेमपत्रं लिहीली आहेत. (हे वाचा-याला म्हणतात LUCK! कपलच्या एका निर्णयामुळे कोरोना त्यांच्यापासून 'कोसो दूर') बिली पेशानं वकिल होता. त्यानं स्वतः ची फर्मही स्थापन केली होती. बिलीची पत्नी सोन्यानं हे पत्र वाचलं आणि सांगितलं की, मला असं वाटतं की, त्याचं निधन झाल्यानंतरही तो मला आनंदी पाहू इच्छित आहे. गुड मॉर्निंग अमेरिका या कार्यक्रमात हे पत्र वाचत असताना ती अत्यंत भावूक झाली होती. ती यावेळी म्हणाली की, हे पत्र वाचणं माझ्यासाठी फार कठीण आहे. परंतु माझ्या पतीनं  माझीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाची ज्याप्रकारे काळजी घेतली होती. ते पाहता त्यानं अशाप्रकारचं पत्र लिहिणं माझ्यासाठी आश्चर्य नाही.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Coronavirus, Patient death, United States of America

    पुढील बातम्या