मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

चहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण? वाचा काय आहे यामागचं सत्य

चहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण? वाचा काय आहे यामागचं सत्य

PIB Fact Check: सोशल मीडियावर काही दिवसांपासून अशी बातमी वेगाने व्हायरल होत आहे की जास्त चहा प्यायलाने कोरोनापासून संरक्षण केलं जाऊ शकतं. वाचा काय आहे यामागचं सत्य

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 10 मे: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये (Second Wave of Coronavirus in India) भारतात खूप मोठं नुकसान होत आहे. दिवसागणिक 4 लाख कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत आहेत. तर हजारोंचा दररोज मृत्यू होत आहे. अशावेळी मास्क, व्हॅक्सिन आणि सोशल डिस्टन्सिंग हेच केवळ तुम्हाला कोरोना संक्रमणापासून (COVID-19) वाचवू शकतात. दरम्यान या काळात कोरोनापासून वाचण्यासाठी लोकं घरबसल्या काही उपाय करत आहे. सोशल मीडियावर काही गोष्टी कोरोनावरी उपाय असल्याचं सांगून पसरवल्या जात आहेत आणि लोकांचा त्यावर विश्वास बसतो आहे. यापैकीच व्हायरल झालेली एक गोष्ट म्हणजे जास्त चहा प्यायल्याने कोरोनाचं संक्रण होत नाही. PIB फॅक्ट चेकने हा दावा फेटाळून लावला आहे. जाणून घ्या काय आहे यामागचं सत्य.

काय आहे दावा?

सोशल मीडियावर एक बातमी शेअर केली जात आहे, ज्यामध्ये हेडलाइनमध्ये असं म्हटलं आहे की, 'खूप चहा प्या आणि पाजा, चहा पिणाऱ्यांसाठी खूशखबर'. या बातमीत असं म्हटलं आहे की चहा पिणारे कोरोना संक्रमणापासून वाचू शकतात आणि कोरोना संक्रमित व्यक्ती चहा प्यायल्याने वाचू देखील शकतो.

काही लोकं सोशल मीडियावर असा देखील दावा करत आहेत की, चीनच्या रुग्णालयांनी कोव्हिडशी लढणाऱ्या रुग्णांना दिवसातून तीन वेळा चहा देण्यास सुरुवात केली आहे. याचा फायदा देखील झाल्याचा दावा केला जात आहे. मेसेजमध्ये अमेरिकेतील CNN न्यूज चॅनेलचा हवाला देत असं म्हटलं आहे की, चीनमधील कोरोना विषाणू संदर्भात विशेषज्ज्ञ त्यांच्या मृत्यूआधी असं सांगून गेले आहेत की, Methylxanthine, Theobromine आणि Theophylline हे केमिकल कोरोना विषाणूला मारू शकतात. हे तीनही केमिकल चहामध्ये आढळून येतात.

काय म्हटलं PIB फॅक्ट चेकने?

सरकारकडून PIB Fact Check च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा दावा फेटाळण्यात आला आहे. या दाव्यामागे कोणतंही वैज्ञानिक प्रमाण नाही आहे की चहामुळे कोरोनाच्या संक्रमणाचा धोता कमी केला जाऊ शकतो, असं पीआयबीनं म्हटलं आहे. सोशल मीडियावरील अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन केलं आहे.

First published:

Tags: Corona, Coronavirus, Tea