मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

'..नाहीतर यूकेसारखी वाईट परिस्थिती आपल्याकडेही होईल'; Omicron बाबत एम्सच्या संचालकांचा इशारा

'..नाहीतर यूकेसारखी वाईट परिस्थिती आपल्याकडेही होईल'; Omicron बाबत एम्सच्या संचालकांचा इशारा

यूकेमध्ये एका दिवसात ओमायक्रॉनच्या 10,000 हून अधिक प्रकरणांची (Omicron Cases in UK) नोंद झाली आहे.

यूकेमध्ये एका दिवसात ओमायक्रॉनच्या 10,000 हून अधिक प्रकरणांची (Omicron Cases in UK) नोंद झाली आहे.

यूकेमध्ये एका दिवसात ओमायक्रॉनच्या 10,000 हून अधिक प्रकरणांची (Omicron Cases in UK) नोंद झाली आहे.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 20 डिसेंबर : देशात कोरोना विषाणूचा नवीन प्रकार 'ओमायक्रॉन'ची (Omicron Variant of Coronavirus) प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. रविवारी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये नवीन रुग्ण आढळल्यानंतर ओमायक्रॉनच्या रुग्णांची (Omicron Cases in India) संख्या 151 वर पोहोचली आहे. दरम्यान, दिल्ली एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया यांनी ओमायक्रॉन प्रकाराबद्दल सांगितलं की, आपण तयारी केली पाहिजे आणि यूकेसारखी वाईट परिस्थिती आपल्याकडे होऊ नये, अशी आशा आहे. यूकेमध्ये एका दिवसात ओमायक्रॉनच्या 10,000 हून अधिक प्रकरणांची (Omicron Cases in UK) नोंद झाली आहे.

Omicron चा धोका..! 'या' देशात लवकरच लागणार Lockdown? नियमावली तयार

यूकेमध्ये गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूच्या संसर्गाची 90,000 हून अधिक नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. डॉ गुलेरिया म्हणाले, “आम्हाला आणखी डेटा हवा आहे. जेव्हा जगाच्या इतर भागात संसर्गाची प्रकरणे वाढतात तेव्हा आपण बारकाईने निरीक्षण केले पाहिजे आणि त्यानुसार तयारी केली पाहिजे.” गेल्या महिन्यात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट समोर आल्यानंतर, ते म्हणाले की ओमायक्रॉनच्या स्पाइक प्रोटीन क्षेत्रात 30 हून अधिक म्यूटेशन आढळले आहे. हे या व्हेरिएंटला रोगप्रतिकारक शक्ती तंत्रापासून वाचण्याची क्षमता विकसित करण्यात मदत करू शकतं आणि त्यामुळे त्याविरूद्ध लसीच्या प्रभावाचे मूल्यांकन करणं आवश्यक आहे.

ब्रिटिश हेल्थ प्रोटेक्शन एजन्सीने (UKHSA) शनिवारी ओमायक्रॉन प्रकाराच्या 10,059 नवीन रुग्णांची पुष्टी केली. ही रुग्णसंख्या शुक्रवारी नोंदवलेल्या 3,201 प्रकरणांच्या संख्येपेक्षा तिप्पट आहे. यासोबतच यूकेमध्ये आतापर्यंत ओमायक्रॉनच्या एकूण 24,968 प्रकरणांची नोंद झाली आहे.

2022 च्या सुरुवातीला Corona ची तिसरी लाट निश्चित, पण... - तज्ज्ञ

Omicron प्रकाराबाबत, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शनिवारी सार्वजनिक आरोग्य सुविधा आणि व्हेरिएंटचा प्रसार रोखण्यासाठी सामाजिक उपाययोजना तातडीने वाढविण्यावर भर दिला. डब्ल्यूएचओच्या दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्राच्या प्रादेशिक संचालक पूनम खेत्रपाल सिंग यांनी सांगितलं की, देश ठोस आरोग्य आणि सामाजिक उपायांनी ओमायक्रॉनचा प्रसार रोखू शकतात. “आपलं लक्ष सर्वात जास्त धोका असलेल्या नागरिकांच्या सुरक्षेवर राहिलं पाहिजे,” असे त्यांनी एका निवेदनात म्हटलं आहे.

First published:

Tags: Corona spread, Corona updates