मराठी बातम्या /बातम्या /देश /

2022 च्या सुरुवातीला Corona ची तिसरी लाट निश्चित, पण... - तज्ज्ञ

2022 च्या सुरुवातीला Corona ची तिसरी लाट निश्चित, पण... - तज्ज्ञ

दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळलेला ओमायक्रॉन (Omicron variant) व्हेरिएंटनं जगभराची चिंता वाढवली आहे. कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट आढळून आल्यानंतर अनेक देशांमध्ये त्याचे रुग्ण आढळून येत आहे.

  • Published by:  Pooja Vichare

नवी दिल्ली, 19 डिसेंबर: काही दिवसांपूर्वी आटोक्यात आलेला कोरोना व्हायरसचा (Corona virus outbreak) पुन्हा एकदा उद्रेक पाहायला मिळतोय. दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळलेला ओमायक्रॉन (Omicron variant) व्हेरिएंटनं जगभराची चिंता वाढवली आहे. कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट आढळून आल्यानंतर अनेक देशांमध्ये त्याचे रुग्ण आढळून येत आहे. भारतातही 15 दिवसांत ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे या व्हेरिएंटमुळे कोरोनाची तिसरी लाट (Third wave of corona) येण्याची दाट शक्यता आहे.

राष्ट्रीय कोविड-19 सुपरमॉडेल समितीनं म्हटलं आहे की, देशात दररोज सुमारे 7500 कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र ओमायक्रॉनमुळे हा आकडा लवकरच वाढण्याची शक्यता आहे. समितीचे प्रमुख विद्यासागर म्हणाले की, ओमायक्रॉनमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असली तरी ती दुसऱ्या लाटेपेक्षा कमी प्रभावी ठरेल. त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, कोरोनाची तिसरी लाट पुढील वर्षी लवकर येण्याची शक्यता आहे.

''तिसरी लाट नक्कीच येईल''

ते म्हणाले की, पूर्वीपासून सुरु असलेल्या लसीकरणामुळे ते तितकेसे प्रभावी होणार नाही. पण, तिसरी लाट नक्कीच येईल. सध्या कोरोनाचे दैनंदिन रुग्ण 7500 च्या आसपास आहेत पण जसजसे Omicron डेल्टाची जागा घेऊ लागेल तसतसा हा आकडा झपाट्याने वाढेल. आयआयटी हैदराबाद येथील प्रोफेसर विद्यासागर यांनी सांगितले की, दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत दैनंदिन प्रकरणे कमी असतील.

'परिस्थिती खूप वाईट असेल तर...'

विद्यासागर यांच्या म्हणण्यानुसार, जर देशात तिसरी लाट आल्यास खूप वाईट स्थित उद्भवल्यास दररोज दोन लाखांहून अधिक केसेस होणार नाहीत. ते म्हणाले की, मी यावर जोर देतो की हे अंदाज आहेत, भविष्यवाणी नाही. आमच्या सिम्युलेशनच्या आधारे, सर्वात वाईट परिस्थितीत दैनंदिन प्रकरणांची संख्या दररोज 1.7 ते 1.8 लाखांपेक्षा कमी असेल. दुसऱ्या लाटेच्या दैनंदिन प्रकरणांच्या तुलनेत निम्म्याहून कमी आहे.

हेही वाचा- सुवर्ण मंदिरात घुसखोरी करणारा तरुण 'या' राज्यातला, मारहाणीत झाला मृत्यू

समितीचे आणखी एक सदस्य, मनिंदा अग्रवाल यांनी सांगितलं की, जर आपण दक्षिण आफ्रिका आणि विशेषत: गौतेंग प्रांताकडे पाहिले, जेथे ओमायक्रॉनची प्रथम ओळख झाली होती, तर आपल्याला प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झालेली दिसते. मात्र सुरुवातीला रुग्णालयात भरतीची परिस्थिती आली नाही. आता ती परिस्थिती सुरू होत आहे.

First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus