प्रत्येक व्यक्तीमध्ये Corona ची विविधं रूपं; का करतोय व्हायरस स्वत:मध्ये बदल?

प्रत्येक व्यक्तीमध्ये Corona ची विविधं रूपं; का करतोय व्हायरस स्वत:मध्ये बदल?

प्रत्येक व्यक्तीवर Coronavirus चे वेगवेगळे परिमाण दिसत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 एप्रिल : डिसेंबर 2019 मध्ये चीनमध्ये उद्रेक झालेल्या कोरोनाव्हायरसने (coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. या व्हायरसचा नाश करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ जुटलेत. मात्र 3-4 महिन्यांत या व्हायरने आपलं रूप इतक्या वेळा बदललं आहे की, शास्त्रज्ञांसमोर एक आव्हानच उभं राहिलं आहे.

अमेरिकेतल्या एका अभ्यासानुसार कोविड-19 हा आजार वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करतो आहे. लॉस एंजेलिस टाइम्समधील लेखानुसार या व्हायरसचा वेगवेगळा प्रभाव पडतो.

सुरुवातीला फक्त वयस्कर व्यक्तींना या व्हायरसची लागण होत होती. 60 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना हा व्हायरस आपला शिकार बनवत होता, मात्र आता तरुणांमध्ये या व्हायरसची प्रकरणं वाढत आहेत. तरुणांचाही मृत्यू होतो आहे. तर लहान मुलांनांही या व्हायरसची लागण झाली आहे. काही लहान मुलांचाही या व्हायरसने बळी घेतला आहे.

हे वाचा - भारतात कोरोनाव्हायरसचा कहर; मात्र मृत्यूच्या आकडेवारीत आश्चर्यकारक घट

एकीकडे या व्हायरसमुळे कित्येक लोकं मरत आहेत. तर कित्येकांना माहितीदेखील नाही की त्यांना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांच्यामध्ये सर्दी, खोकला, ताप अशी कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत आणि ते व्हायरस पसरवत जातात.

व्हायरस अशी रूपं का बदलतोय?

वयस्कर, मधुमेह, हृदय, फुफ्फसांचे आजार असलेल्यांना याचा धोका जास्त आहे. मात्र मृत्यूच्या बाबतीत या व्हायरसची भूमिका स्पष्ट होऊ शकलेली नाही.

वृद्ध व्यक्ती इतर आजारपणांमुळे लवकर बरे होत नाहीत. मात्र निरोगी व्यक्तींनाही हा आजार बळावत आहे.

कदाचित लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कशी प्रतिक्रिया देते यावर अवलंबून आहे.

हे वाचा - कोरोनाबाबत चीनच्या डॉक्टरांचा भारताला सल्ला, Lockdown नंतर काय करायला हवं?

आश्चर्य म्हणजे इतर आजारांप्रमाणे या व्हायरसचा परिणाम लहान मुलांवर जास्त नाही. यातून या व्हायरसला समजून घेण्यास मदत होईल आणि पुढील 6 महिन्यात व्हायरसबाबत अधिक माहिती असेल.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: April 26, 2020, 11:32 AM IST

ताज्या बातम्या