मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /उपचारासाठी 200 कोरोना रुग्णांना पोहोचवलं रुग्णालयात, त्याच कोरोना योद्ध्याने गमावला जीव

उपचारासाठी 200 कोरोना रुग्णांना पोहोचवलं रुग्णालयात, त्याच कोरोना योद्ध्याने गमावला जीव

मुस्लिम असूनही त्यांनी हिंदूंवर अंत्यसंस्कार केले. या कोव्हिड यौद्धाच्या मृत्यूनंतर अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे.

मुस्लिम असूनही त्यांनी हिंदूंवर अंत्यसंस्कार केले. या कोव्हिड यौद्धाच्या मृत्यूनंतर अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे.

मुस्लिम असूनही त्यांनी हिंदूंवर अंत्यसंस्कार केले. या कोव्हिड यौद्धाच्या मृत्यूनंतर अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : देशात आणि जगभरात असंख्य लोक आहेत, जे कोरोनाच्या परिस्थितीत आपल्या घरापासून दूर आहेत. मात्र लोकांची मदत करत आहेत. अशीच एक व्यक्ती म्हणजे आरिफ खान. दिल्लीच्या सीलमपूरमधली रहिवासी आरिफ गेल्या 6 महिन्यांपासून घरी गेले नाही आहे. आरिफ हे एक दिल्लीतील रुग्णवाहिका चालक होते. या सहा महिन्यांत त्यांनी 200 कोरोना रुग्णांना आपल्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले. त्यांच्यातील काहींच्या मृत्यूनंतर, त्यांना अंत्यसंस्कारासाठी स्मशानात नेले. कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी वॉरियर प्रमाणे आरिफ 24 तास उपलब्ध होता. मात्र शनिवारी आरिफचेच कोरोनानं निधन झाले.

आरिफ खान दिल्लीतील शहीद भगतसिंग सेवा दलात काम करायचे, ते मोफत रुग्णवाहिका सेवा पुरवत असे. एवढेच नाही तर, एखाद्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आणि त्याच्या कुटूंबाकडे अंत्यसंस्कारासाठी पैसे नसतील तर आरिफ त्यांना मदतही करत असे. मात्र लोकांना मदत करणाऱ्या आरिफ यांचाच शनिवारी मृत्यू झाला. आरिफला यांचे अखेरचे दर्शनाही कुटुंबियांना घडले नाही.

वाचा-मास्कचा कंटाळा येतो? पण मास्क वापरणाऱ्यांनाच कमी आहे कोरोनाचा धोका- संशोधन

मिळालेल्या माहितीनुसार, 3 ऑक्टोबर रोजी आरिफची तब्येत खालावली, त्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. आरिफचा 22 वर्षाचा मुलगा आदिल म्हणाला, की त्यांनी मार्चपासून त्यांना कधीतरी पाहिले. त्यांचे कुटुंब नेहमीच त्यांची चिंता करत असे, मात्र ते कोरोनाला घाबरून घरी बसले नाहीत.

वाचा-पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी! डिसेंबर-जानेवारीत आणखी वाढणार कोरोनाची आकडेवारी

आरिफ एकटेच कमवते होते.त्यांचा पगार 16 हजार रुपये होता. घराचं भाडं 9000 होते, त्यामुळे आरिफच्या मृत्यूनंतर कुटुंबही संकटात आहे. आरिफचा यांचे मित्र जितेंद्र कुमार म्हणाले की, कुटुंबावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. आरिफ कायम लोकांना मदत करत असे. मुस्लिम असूनही त्यांनी हिंदूंवर अंत्यसंस्कार केले. या कोव्हिड यौद्धाच्या मृत्यूनंतर अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे.

First published:

Tags: Corona, Coronavirus