नवी दिल्ली, 08 जुलै : एकिकडे कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेशी अद्यापही लढा सुरू आहे. तिसऱ्या लाटेचा धोका आहे आणि आता त्यात आणखी एका नव्या व्हायरसची भर पडली आहे. कोरोनाव्हायरसनंतर आता साइटोमेगलोव्हायरसचं (Cytomegalovirus) संकट ओढावलं आहे. या व्हायरसची लागण झाल्याचे सहा रुग्ण सापडले आहेत. दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमध्ये सहा रुग्णांना साइटोमेगलोव्हायरस झाल्याचं निदान झालं आहे. या रुग्णांना कोरोनाव्हायरसचीही लागण झाली. त्यानंतर 20 ते 30 दिवसांतच त्यांना या दुसऱ्या व्हायरसची लागण झाली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अपोलो रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या या रुग्णांना गेल्या महिन्यात कोरोनामुळे गंभीर न्युमोनियाही झाला होता. त्यांना स्टेरॉइड भरपूर प्रमाणात देण्यात आलं होतं. त्यांना जेव्हा सीएमव्ही आजाराचं निदान झालं तोपर्यंत ते कोरोना निगेटिव्ह झाले होते. हे वाचा - डेल्टा प्लस व्हॅरिएंटचा धोका; तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलचे कन्सल्टंट डॉ. अतहर अन्सारी यांनी सांगितलं, गेल्या महिन्यात आम्हाला सहा रुग्णांमध्ये कोरोनानंतर सीएमव्ही आजाराचं निदान झाल्याचं दिसलं. याची लक्षणं आपल्या शरीराचा कोणत्या भागावर परिणाम होतो आहे, त्यावर अवलंबून आहे. जर फुफ्फुसावर याचा परिणाम झाला तर रुग्णाला ताप येतो, श्वास घ्यायला त्रास, छातीत वेदना, खोकला अशी लक्षणं दिसतात. कोरोनाचं निदान झाल्यानंतर या रुग्णांना 20-30 दिवसांनी रुग्णांच्या फुफ्फुस आणि छातीत सूज, हायपोक्सिया दिसून आलं. तर एका रुग्णात मेलोइड ल्युकेमियाही दिसून आला. साइटोमेगलोव्हायरस संक्रमण हे सामान्य हर्रपीज व्हायरसचं संक्रमण आहे. हा व्हायरस 80 ते 90 टक्के भारतीय लोकसंख्येत आधीपासूनच असतो. सीएमव्ही आजार सामान्यपणे ज्यांची प्रतिकारक शक्ती आधीपासूनच कमी आहे, त्यांच्यात दिसून येतो. एचआयव्ही, कॅन्सर, ट्रान्सप्लांड रुग्ण ज्यांना प्रतिकारकशक्तीवर नियंत्रण ठेवण्याचं औषध दिलं जातं, त्यांना हा आजार दिसून येतो. कोरोनाव्हायरसमुळे प्रतिकारक शक्ती कमजोर झाल्याने आणि स्टोरॉईड दिल्याने सीएमव्ही हा कोरोना रुग्णांवरही हल्ला करत आहे. हे वाचा - कोरोनाचा नवा लॅम्बडा व्हेरियंट आढळला; Delta पेक्षा अधिक धोकादायक असण्याची शक्यता रुग्णालयातील सीनिअर कन्सलल्टंट डॉ. अवधेश बन्सल यांनी सांगितलं, या रुग्णांमध्ये सीएमव्ही अॅक्टिव्ह होण्याचं कारण कोरोनामुळे प्रतिकारक शक्ती कमजोर होणं आणि स्टेरॉइड थेरेपीचा अधिक डोस देणं हे असू शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.